शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवी अस्पृश्यता दूर झाली पाहिजे

By admin | Updated: January 18, 2016 00:34 IST

गिरीश कुलकर्णी : शांतिनिकेतनच्यावतीने ‘कर्मयोगी’ पुरस्कार प्रदान

सांगली : एकीकडे आपण चंद्रावर पोहोचल्याच्या गप्पा मारत असतानाच, कुपोषणाने होणारे लक्षावधी मृत्यू आपली मर्यादा दाखवून देत आहेत. सुधारणेच्या गप्पा होत असताना, एचआयव्ही बाधितांवर उपचार करण्यास अनेक डॉक्टर कचरतात हेसुद्धा वास्तव आहे. त्यामुळे २१ व्या शतकातील ही नव्याने निर्माण झालेली अस्पृश्यता दूर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी रविवारी केले. येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा भावनिक एकात्मतेचा ‘कर्मयोगी’ पुरस्कार यंदा अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्याहस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी बोलत होते.कुलकर्णी पुढे म्हणाले की, एकीकडे शहरात मोकळा श्वास घेणे मुश्किल होऊन बसले असताना, माणसातील संकुचितपणाही वाढत आहे. समाजात शिक्षण वाढत चालले असताना, शहाणपणा कमी होत चालल्याने, यात जर बदल घडवायचा असेल, तर माणूस बदलला पाहिजे. शिकलेल्या, स्वत:जवळ ज्ञान असलेल्या व्यक्तींनी आता तुटत चाललेला हा संवाद जोडणे आवश्यक असून, यासाठी चांगल्या समाजाच्या निर्मितीचे दायित्व प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक आहे. देशात होत असलेल्या बदलामुळे समाज एकीकडे प्रगतीपथावर चालला असल्याचा भास निर्माण करण्यात येत आहे. त्याचे चांगले-वाईट परिणामही दिसून येऊ लागले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचा दर वाढत चालला असताना, शहराकडील समाजाचा ओढाही वाढत चालला आहे. २०२० पर्यंत ६० टक्के जनता शहरी भागात असेल, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, त्यांच्या समस्यांतही वाढ झाली असेल. झोपडपट्टीचे मोठे जाळे निर्माण होत असून, गुप्तरोग, एड्स, बालकामगार, शोषण, व्यसनाधीनतेबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करायला कोणच तयार नाही. हे भयावह आहे. ही विषमता दुर्लक्षित करून चालणार नाही, असे ते म्हणाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले की, ‘मी नाही, तर कोण’ आणि ‘आता नाही, तर कधी’ हे दोन शब्दच समाज परिवर्तन करणाऱ्या माणसांना घडवितात. आपल्या जगण्यात आशय प्राप्त होणारी व्यक्ती विनम्र असतात. त्यामुळे त्यांच्या हातून समाज परिवर्तनाचे काम घडते. परिवर्तनाची ज्याला तळमळ आहे, तो कार्यकर्ता सामाजिक कार्य करतो, तर मळमळ असणारा कार्यकर्ता केवळ हे बदल पाहतो, असेही देशमुख यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. राज्यस्तरीय रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेचेही बक्षीस वितरण यावेळी झाले. स्वागत डॉ. अविनाश पाटील यांनी, तर प्रास्ताविक शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील यांनी केले. यावेळी महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे सचिव सूर्यकांत पवार, वैभव नायकवडी, बी. आर. थोरात, डॉ. मोहन पाटील, शौकत मुलाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कर्मयोगी पुरस्कारातून मिळालेल्या एक लाखाच्या रकमेतून कुडाळ येथील प्रकल्पाच्या जमिनीचे काम करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगत, या प्रकल्पास प्राचार्य पी. बी. पाटील यांचे नाव देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी उपस्थित असलेले शांतिनिकेतनचे माजी विद्यार्थी, गौतम पाटील यांचे वर्गमित्र आणि सांगलीतील उद्योजक राजू शेख यांनी कुलकर्णी यांना पुरस्कारासाठीची रक्कम फौंडेशनच्या कामासाठी वापरण्याचे आवाहन करत कुडाळ येथील प्रकल्पासाठी स्वत:हून एक लाखाची देणगी जाहीर केली.भेकडपणाही वाढतोयसमाजाचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना कमी होत असतानाच, शिकलेली पिढी वाढत असताना त्यातील शहाणपण कमी होत चालले आहे. आजकाल समाजातून देणगीदार मिळणे सोपे झाले असताना एखाद्या महत्त्वाच्या घटनेत आवश्यक असणारे साक्षीदार मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे समाजात शैक्षणिक प्रगती झाली असली, तरी समाजाचा भेकडपणाही वाढत चालला असल्याची खंत कु लकर्णी यांनी व्यक्त केली.