शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीची पहिली ते बारावीची नवी पुस्तके उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

कोल्हापूर: नव्या पुस्तकांची प्रतीक्षा संपली असून, बालभारतीची १ ली ते १२ ची विविध माध्यमांतील पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाली ...

कोल्हापूर: नव्या पुस्तकांची प्रतीक्षा संपली असून, बालभारतीची १ ली ते १२ ची विविध माध्यमांतील पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. मंडळाकडे नाेंदणीकृत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था व अधिकृत विक्रेत्यांनी भांडारातून खरेदी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे.

नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधीच बालभारतीकडून नवी पुस्तके बाजारात उपलब्ध होत असत, पण यावर्षी लॉकडाऊन परिस्थितीमुळे पुरवठा वेळेत होऊ शकला नाही. परिणामी शाळेचा पहिला दिवस विनापुस्तक अथवा जुन्या पुस्तकावरच गेला. आधीच ऑनलाइन शिक्षणामुळे शिकवण्याचा गोेंधळ सुरू असताना पुस्तकेच उपलब्ध होत नसल्याने अभ्यासाचे व आकलनाचे काय? असा प्रश्न उभा ठाकला होता. आता नवी पुस्तके येत असल्याने विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कोरोनाच्या साथीमुळे नियमित व्यवहार बंद असून काही शहरांतील दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व पाठ्यपुस्तके मंडळाच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावरदेखील पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सर्व पाठ्यपुस्तके मंडळाच्या संकेतस्थळावरून विनामूल्य डाऊनलोड करून घेता येत असल्याने शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

चौकट ०१

पुस्तक भांडारातही किरकोळ विक्री

शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनाही पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी मंडळाच्या सर्व विभागीय भांडारात किरकोळ विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता सर्व वर्गांच्या सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके मंडळाच्या मुंबई (गोरेगाव), पनवेल, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व कोल्हापूर या ९ विभागीय भांडारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ही पुस्तके मिळणार

उपलब्ध माध्यमे इ. १ ली ते इ. ८ वी – १० माध्यम (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगु, तमिळ व बंगाली), इ. ९ वी व इ. १० वी – ८ माध्यम (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी व तेलुगु), इ. ११ वी व इ. १२ वी – विज्ञान शाखा (इंग्रजी माध्यम), वाणिज्य व कला शाखा - २ माध्यम (मराठी व इंग्रजी).