शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कॅनॉलवर उभारला नवा साकव

By admin | Updated: February 3, 2015 23:54 IST

लोकमत इफेक्ट : बोरवडे-उंदरवाडीतील ग्रामस्थांना दिलासा

रमेश वारके - बोरवडे -‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पाटबंधारे खात्याने बोरवडे व उंदरवाडी या गावांतील कॅनॉलवर नवीन साकव तयार केले. या नव्या साकवांमुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ‘पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष’, ‘साकवावरील वाहतूक बनली मृत्यूचा सापळा’, ‘बोरवडे-उंदरवाडी साकवाची दुरवस्था’, असे वृत्त प्रकाशित करत ‘लोकमत’ने याचा पाठपुरावा केला होता.कागल तालुक्यातील बोरवडे व उंदरवाडी या गावांच्या कॅनॉलवर असणाऱ्या साकवांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे अनेक अपघात होऊनही याकडे पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाले होते. कॅनॉल दुथडी भरून वाहत असल्याने दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत होती. साकवावरील पत्रा गंजून तो कमकुवत झाल्याने सडत चालला होता. त्यामुळे जनावरांचे पाय अडकणे, वाहतूक करताना शेतकरी पडणे, फाटलेल्या पत्र्यात पाय अडकून जखमा होणे, असे अपघात येथे वारंवार घडत होते. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करून साकवाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला होता.साकवाच्या पूर्ततेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना नेऊन त्याचा पंचनामा करून आंदोलने केली होती. या साकवाच्या उभारणीमुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.साकव नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांचा प्रवास बंद होता. त्यामुळे साकव दुरुस्तीची मागणी सतत होत होती. पाटबंधारे खात्याच्या सहकार्यामुळे नवीन साकव उभारण्यात आला असून, यामुळे सर्वांचाच त्रास कमी होणार आहे. - चंद्रकांत पाटील, सरपंच या दोन्ही गावांतील साकवाच्या पूर्ततेसाठी आम्ही अनेकवेळा आंदोलने केली. साकव पूर्ण होणे ही शेतकऱ्यांची गरज होती. यामुळे येथील दळणवळण सोपे झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी यामुळे दूर होणार आहेत.- विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख.