शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नेसरी-कोवाड वाहतूक आता बारमाही

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

‘लोकमत’चा पाठपुरावा : तारेवाडी पर्यायी पुलास मिळाला निधी

राम मगदूम - गडहिंग्लज -‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने घटप्रभा नदीवरील तारेवाडी बंधाऱ्यानजीक प्रस्तावित पर्यायी पुलास तीन कोटी ७७ लाख ४० हजारांचा निधी मंजूर केला. ९० लाख ५८ हजारांच्या टोकण बजेटसह नवीन पुलास मंजुरी दिल्यामुळे नेसरी-कोवाड मार्गावरील वाहतूक आता बारमाही ‘सुरळीत’ व ‘सुरक्षित’ राहणार आहे. त्यामुळे नेसरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.१९७२ मध्ये नेसरी-कोवाड मार्गावर तारेवाडी-हडलगे दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा पूलवजा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे हडलगे, तारेवाडी, डोणेवाडी, तावरेवाडी व नेसरी या पाच गावांच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था झाली. तसेच वाहतुकीसाठीही या बंधाऱ्याचा वापर सुरू झाला.तारेवाडीनजीक ‘एस’ आणि ‘यू’ आकारातील धोक्याच्या वळणावर सखल भागात सध्याचा बंधारा आहे. त्याचे संरक्षक कठडेही निकामी झाले आहेत. बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्यांना, वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. गेल्या सात-आठ वर्षांत याठिकाणी झालेल्या अपघातात चारजणांचा, तसेच चार बैलांचाही मृत्यू झाला आहे.सध्याचा बंधारा रस्त्याच्या पातळीपेक्षाही सखल भागात आहे. दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जाऊन या मार्गावरील वाहतूक ८-१५ दिवस खंडित व्हायची. त्यामुळे पर्यायी पूल बांधण्यात यावा, अशी जनतेची मागणी होती. स्व. बाबासाहेब कुपेकर यांनीही त्याचा पाठपुरावा केला. पायाभूत सुविधांतर्गत नाबार्डच्या मंजूर कामांच्या यादीत या पुलाचा समावेश होता. प्राथमिक पाहणी व स्थळ पाहणीअंती सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यायी पुलाचा प्रारूप आराखडा तयार केला. संकल्पचित्र मंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव नाबार्डकडे दाखल केला. नाबार्डने त्यास हिरवा कंदील दाखविला. परंतु, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला असून, पर्यायी पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.महापुरातही सुरळीत वाहतूकनवीन पूल उच्चतम पूरपातळीपेक्षाही अधिक उंचीवर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे महापुराच्या काळातही या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहणार आहे. धोकादायक वळण निघणारसध्याच्या बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील बाजूच्या बैलगाडी मार्गास जोडणाऱ्या आणि काटकोनात बांधल्या जाणाऱ्या नवीन पुलावरील दोन पदरी रस्त्यामुळे सध्याचे धोकादायक वळण निघण्यास मदत होणार आहे.