शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याचे दुर्लक्षित अश्नीस्तंभ आता जागतिक वारसास्थळात नोंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

पन्हाळा : पन्हाळ्याच्या पायथ्याशी दुर्लक्षित आसणारे अश्नीस्तंभ आता जागतिक वारसास्थळात नोंद होत असल्याने पन्हाळ्याचे नाव आणखीनच उंचावले आहे पन्हाळा ...

पन्हाळा : पन्हाळ्याच्या पायथ्याशी दुर्लक्षित आसणारे अश्नीस्तंभ आता जागतिक वारसास्थळात नोंद होत असल्याने पन्हाळ्याचे नाव आणखीनच उंचावले आहे

पन्हाळा वनविभागाने विशेष प्रस्ताव दाखल करून हे अश्नीस्तंभ जागतिक वारसास्थाळात नोंद करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतल्याची माहिती परिक्षेत्र वनअधिकारी प्रियांका दळवी यांनी दिली. यासाठी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॕॅ. क्लेमेंट बेन यांचे व भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. पिष्टे यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

साधारण ७० लाख वर्षांपूर्वी पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरमाला अस्तित्वात आली तेव्हा अश्नीस्तंभ ही रचना बनली, गरम असलेला शिलारस बेसॉल्ट प्रकारच्या काळ्या दगडात परावर्तित होऊन या रचनेचा हा समूह तयार झाला आहे. हवामान आणि भूगर्भीय हालचालींमुळे यातील माती आणि इतर गोष्टी यांची धूप होऊन हे अद्भुत, नैसर्गिक, आश्चर्यकारक दगड उघड्यावर आले. अगदी कोरून एकमेकांवर ठेवल्याप्रमाणे हे भल्या मोठ्या दगडांचे उंचच उंच असे नैसर्गिक दगडी खांब तयार झाले आहेत. दहा ते बारा किंवा जास्त दगड एकेका खांबात आहेत. हे भक्कमपणे उभे आहेत. यातील एका खांबात तर मधला दगड फुटून खांबातच सुंदर अशी खिडकी बनली आहे. अश्नीस्तंभाची उंची १५ फुटांपासून साधारणतः २५ फुटांपर्यंत आहे. अशीच आणखी एक शृंखला पन्हाळा ते मसाई पठार या दरम्यान आहे; पण ती एकदम लहान आहे. एका रांगेतील दोन पठारांना जोडणाऱ्या चिंचोळ्या भागात अशी रचना दिसून येते. पूर्ण जगात अशा तीनच रचना आहेत. आयर्लंडमध्ये डेविल्स रॉक्स, कर्नाटकमध्ये मेरी आयर्लंडवरील रचना आणि पन्हाळ्याजवळील ही अश्नीस्तंभ रचना. पन्हाळ्या व्यतिरिक्त दोन्ही ठिकाणी या रचना समुद्रकिनारी आहेत. त्यांचे दिसणे वेगळे आहे; पण पन्हाळ्याजवळील रचना पूर्णपणे भिन्न दिसते. इथे नैसर्गिक गुहाही आहेत.

पन्हाळा वनविभागाने या ठिकाणी चढाई करण्यास, गुरे चारण्यास मनाई केली आहे. आता या ठिकाणी हे अश्नीस्तंभ पाहण्यासाठी विशेष योजना करण्यात येईल, अशी माहिती वनाधिकारी प्रियांका दळवी यांनी दिली. ज्वालामुखी, शिलारस, बेसॉल्ट यांचा भरपूर सखोल अभ्यास या ठिकाणी केला जाऊ शकतो. सह्याद्रीच्या रांगेतील ही भौगोलिक वैशिष्ट्ये नक्कीच पाहिली व जपली पाहिजेत. अश्नीस्तंभ पाहण्यासाठी पन्हाळा ते बांदिवडे हे अंतर सात किलोमीटर आहे आणि कोल्हापूरवरून बांदिवडे २५ किलोमीटर अंतर आहे. बांदिवडेच्या अलीकडे उजव्या बाजूला हे अश्नीस्तंभ दिसून येतात.

फोटो ................ अश्नीस्तंभाचे विविध पैलू