शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणांच्या पुढाकाराची गरज

By admin | Updated: July 27, 2014 01:13 IST

मोनिका सिंग : मुरगूडमध्ये मतदार जागृती अभियान

मुरगूड : जगात लोकशाही पद्धतीने शासन स्थापन करण्याची भारतातील पद्धत उल्लेखनीय आहे; पण खऱ्या अर्थाने या लोकशाहीला बळकटी आणावयाची असेल तर तरुणांनी मतदान करणे, नोंदणी, तसेच निवडणूक लढविण्यासाठीसुद्धा पुढे आले पाहिजे, असे आवाहन कागल-राधानगरीच्या प्रांताधिकारी मोनिका सिंग यांनी केले. मुरगूड (ता. कागल) येथे मंडलिक महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियानाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अर्जुन कुं भार होते. यावेळी मंडल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी जे. सी. चंदनशिवे उपस्थित होते. मोनिका सिंग म्हणाल्या, तरुणांचा निवडणूक कार्यक्रमातील अत्यल्प सहभाग हा चिंतनीय विषय आहे. शासनाला बळकटी आणण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यावेळी मुख्याधिकारी बी. एस. जगताप, प्राचार्य कुंभार यांची भाषणे झाली. प्रा. टी. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. पांडुरंग सारंग, प्रा. शिवाजीराव होडगे, आदी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तलाठी जे. एम. चंदनशिवे यांनी आभार मानले. (वार्ताहर)