शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतरच्या मुलांच्या भावजीवनावर लेखन होणे गरजेचे : किरण केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:26 IST

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी व्याख्यानमालेत ते ...

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी व्याख्यानमालेत ते बोलत होते. या बालसाहित्य व्याख्यानमाले अंतर्गत केंद्रे यांनी ‘बालसाहित्यिकाकडून अपेक्षा’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. या आभासी व्याख्यानमालेचे संयोजन गोविंद पाटील, वि. द. कदम, प्रा. विनोद कांबळे यांनी केले.

बालसाहित्य हे बालमनाला अलगद स्पर्शून जाणारं असावं असे सांगून किरण केंद्रे म्हणाले, हलक्याफुलक्या शब्दकळांनी संस्कार संपन्न करणार असं साहित्य येणे गरजेचे आहे. बालसाहित्य आणि चित्र यांची सांगड घालण्याचं काम मुलं करीत आहेत. बालसाहित्य हे सहजतेने घेणारी गोष्ट नाही. सोपं लिहिणं सर्वांत कठीण असतं हे बालसाहित्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. साहित्याचा उद्देशात माहिती, मूल्यं आणि शहाणपण हे आहे. बालसाहित्यामधून यातला नेमका उद्देश मुलांना व्यापक दृष्टिकोनातून सांगण्याची गरज आहे.

मराठी बालसाहित्याची उपेक्षा

महाराष्ट्रामध्ये मराठी बालसाहित्याची उपेक्षा झालेली दिसते. या साहित्याकडे जितक्या गंभीरतेने मराठी साहित्याने बघायला पाहिजे होतं तितकं बघितलं नाही. जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत बालसाहित्यामध्ये नावीन्यपूर्ण लेखन येणार नाही. ‘किशोर’ मासिकाचे काम करीत असताना रोज अनेक प्रकारचे साहित्य येतं. मात्र, यातलं नेमकं बालसाहित्य आम्ही प्रसिद्ध करीत असतो, असेही त्यांनी सांगितले.

--------------------------------------------------------------------------------------------

फोटो : 24052021-kol-Kiran Kendre

(बातमीदार : संदीप आडनाईक)

===Photopath===

240521\24kol_9_24052021_5.jpg

===Caption===

फोटो : 24052021-kol-Kiran Kendre