कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या न्यायव्यवस्थेत फार आमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या काळात प्रत्येकजण हुकूमशाही पद्धतीने वागला आणि ज्या दिवशी असा प्रकार घडेल तो दिवस काळा असेल, असे मत आज, रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व नागपूर येथील विकास सिरपूरकर यांनी व्यक्त करून न्यायव्यवस्था टिकणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.ते ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम आणि अमृतमहोत्सवी श्री महालक्ष्मी को-आॅप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ते ‘न्यायव्यवस्था-कथा आणि व्यथा’ या विषयावर बोलत होते. मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर हे व्याख्यान झाले.विकास सिरपूरकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायव्यवस्थेत बदल होते. ही व्यवस्था अधिकारावर चालायची. कोलकात्यामधील नंदकुमार घोष या संस्थानिकाला फसवणूकप्रकरणी फाशीची शिक्षा देणारे हे इंग्रज त्या काळात होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, आपण घटना किशी लिहिली त्यापेक्षा ती घटना चालवणारे कसे आहेत, याचा विचार प्रथम व्हायला पाहिजे तरच आपण त्याची अंमलबजावणी करू शकलो, असे म्हणेन. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे तसेच समाजातील शोषित घटकांना न्याय मिळालाच पाहिजे, असे न्यायाधीशांचे मत असते. सध्या ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशांनाच न्याय मिळत आहे, यावर त्यांनी खंत व्यक्त केली. घटस्फोट असो अथवा कुळ-मालक वाद असो, त्यामध्ये न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पक्षकारांना न्याय लवकर द्यावा, हीच अपेक्षा न्यायाधीशांची असते. न्यायव्यवस्था कोसळेल त्या दिवशी जंगलराज व ठोकशाहीचे राज्य येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
न्यायव्यवस्था टिकणे गरजेचे : सिरपूरकर
By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST