शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनासाठी प्रयोजनाची गरज

By admin | Updated: August 4, 2015 00:10 IST

अभय बंग : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान

विटा : व्यसनांचे व्यापारी नव्या पिढीला बरबाद करण्यासाठी सरसावले आहेत; पण नव्या पिढीने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. शिक्षण व करिअर यांचे आयोजन करून चालणार नाही, तर जीवन कसे व कशासाठी जगावे, याचे प्रयोजन करण्याची खरी गरज असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने डॉ. बंग यांना यावर्षीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील, भाई संपतराव पवार, आशाताई बोले, अ‍ॅड. सुभाष पाटील, अध्यक्ष सुभाष पवार उपस्थित होते.प्रारंभी डॉ. बंग यांना भाई वैद्य, श्रीमती हौसाताई पाटील यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. बंग म्हणाले, लहान-लहान राजकीय पुढाऱ्यांची मोठी-मोठी पोस्टर्स लागतात, तेव्हा भारतीय समाजाचा सूर्य अस्ताला आला आहे का? असा प्रश्न पडतो. व्यसनांचे व्यापारी वाढल्याने तंबाखू, मावा, गुटखा, दारूचा रोग समाजात वाढू लागला आहे. गडचिरोली जिल्'ाचे वार्षिक बजेट १५७ कोटीचे असताना, व्यसनांसाठी तेथील लोक २६० कोटी रूपयांचा चुराडा करतात. ही गंभीर बाब आहे. दारूबंदी, व्यसनमुक्ती हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जवळचे विषय होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपत असताना तरुण पिढीसह समाजाने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. महात्मा गांधीजींच्या आश्रमात आम्ही शिकलो. त्यामुळे गांधीजींची समाजकार्याची प्रेरणा आम्हाला मिळाल्याने आम्हा दोघा भावांना गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अदिवासी लोकांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले.यावेळी भाई वैद्य म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अंगात देशाला स्वातंत्र्य देण्याचे काम भिनले होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आज प्रेरणादायी आहे. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांचे आयुष्य उजाळले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलांच्यात जी प्रेरणा, जो आवेश होता, तो मात्र आज दुर्दैवाने पाहावयास मिळत नाही. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (वार्ताहर)