उचगाव : जागतिक एकता, सामूहिक जबाबदारी लक्षात घेऊन समाजातील सर्वच घटकांनी एचआयव्ही/ एड्स निर्मूलन कार्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते उजळाईवाडी (ता. करवीर) येथे आयोजित एचआयव्ही/ एड्स प्रबोधन पोस्टर प्रदर्शन, माहिती, शिक्षण व संवाद कार्यक्रमात बोलत होते. युवा ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पाटील यांनी युवा संस्थेच्या उपक्रमांना समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, प्रा. संयोगीता पाटील, विक्रीकर सहआयुक्त संजय माने, माजी सरपंच ज्ञानदेव जाधव, उपनगर विकास आघाडीचे उत्तम आंबवडे, बुलगानिण कांबळे, ग्रा. पं. सदस्य नंदकुमार मजगे, कल्पना कांबळे, रीना गुमाने, लक्ष्मण केसरकर, राजाराम माने उपस्थित होते.
फोटो ओळ: ०३ उचगाव सतेज पाटील
स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाच्या वतीने जागतिक एकता, सामूहिक जबाबदारी या घोषवाक्यातून जनजागृती होण्यासाठी माहिती, शिक्षण व संवाद पत्रिकेच्या प्रकाशनप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटील, उत्तम आंबवडे, मोहन सातपुते, आदी. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने युवा ग्रामीण विकास संस्था, स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प, गोकुळ शिरगाव या सामाजिक संस्थेचे एचआयव्ही/ एड्स प्रबोधनाचे उपक्रम स्थलांतरित कामगारांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.