त्या देवाळे (ता. करवीर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प करवीर बीट हसूर अंतर्गत पोषण माहअभियान शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच शालन पाटील या होत्या. या वेळी पोषण अभियान रॅलीचे उद्घाटन उपसरपंच संजय धुमाळ यांच्या हस्ते, ग्रामसेवक प्रवीण खराळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहल सरनाईक म्हणाल्या, माता व बालकाला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी तसेच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या वेळी सरपंच शालन पाटील, उपसरपंच संजय धुमाळ, सर्जेराव पाटील, अंगणवाडी सेविका सोनल पाटील, सविता पाटील, याच्यासह अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}