शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची गरज

By admin | Updated: January 16, 2016 00:49 IST

कैलाश चंद्रा : विद्यापीठातील ‘जैवविविधता, जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ परिषदेला प्रारंभ

कोल्हापूर : बदलती जीवनशैली आणि त्या जीवनशैलीच्या मागणीपोटी पर्यावरणाप्रती वाढत चाललेला निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. कैलाश चंद्रा यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘जैवविविधता व जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे होते.डॉ. चंद्रा म्हणाले, जैवविविधता कुठेतरी दूर असते. तिचा आपल्याशी काही संबंध नाही, असे नसते. जैवविविधतेचा आपल्या प्रत्येक कृतीवर परिणाम दिसून येतो. जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होताना दिसतो. जैवस्रोतांविषयी संशोधन आणि त्यांचे व्यवस्थापन याला आजघडीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी. जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे केवळ मानवच नव्हे, तर भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षण ही अनिवार्य बाब आहे,डॉ. मोरे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येचा सर्वाधिक चिंताजनक दुष्परिणाम जैवविविधतेवर झालेला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी जशा उपाययोजना केल्या जातात. तशाच त्या जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीतही योजणे गरजेचे आहे. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. परिषदेचे समन्वयक डॉ. डी. व्ही. मुळे यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे संयोजन सहसचिव डॉ. जी. व्ही. झोडपे यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात प्रा. जी. एन. वानखेडे, डॉ. पी. एस. भटनागर, डॉ. वरद गिरी यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात उत्कृष्ट शोधनिबंध स्पर्धा व उत्कृष्ट पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली. (प्रतिनिधी)जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होतात.प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी.जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाहीप्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षणही अनिवार्य