शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या चरणी २० तोळ्यांचा हार अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:40 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चरणी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गिरिजा हत्तीहोळी यांनी साडेवीस तोळ्यांचा तब्बल ...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चरणी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गिरिजा हत्तीहोळी यांनी साडेवीस तोळ्यांचा तब्बल सात लाख ३९ हजार ३५२ रुपये किमतीचा ११ पदरी सोन्याचा हार शुक्रवारी अर्पण केला.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी रीतसर पावती करून या हाराचा स्वीकार केला. नित्यनियमाने शुक्रवारी देवीची आलंकारिक पूजा बांधली होती. त्यात हा सोन्याचा हारही देवीला दिवसभर अन्य सोन्याच्या अलंकारांसोबत परिधान केला होता. यावेळी हत्तीहोळी यांना देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून साडी देण्यात आली.यानंतर देवस्थान समितीतर्फे नवरात्रौत्सव उत्साहात पार पडण्यासाठी साहाय्य केल्याबद्दल पोलीस प्रशासन, महालक्ष्मी भक्त मंडळ, व्हाईट आर्मी, आदी संघटना, संस्थांचाप्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, एन. डी. जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.