शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या दौऱ्यापूर्वी शहर राष्ट्रवादीतील अस्वस्थता उघड

By admin | Updated: January 11, 2016 01:09 IST

खलबते : आर. के. पोवार समर्थकांची पन्हाळा येथे बैठक

कोल्हापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक होऊन नऊ महिने झाले तरी शहरात कार्यकारिणी निवड झालेली नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल शहर राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांत कमालीची खदखद असून, आगामी काळात याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याबाबत रविवारी माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या समर्थकांची ऐतिहासिक पन्हाळगडावर बैठक होऊन यामध्ये आगामी दिशा ठरविण्यात आल्याचे समजते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी पक्षांतर्गत या घडामोडीला महत्त्व आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक नऊ महिन्यांपूर्वी झाली. यामध्ये आर. के. पोवार व राजू लाटकर हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. क्रियाशील सभासदांनी पोवार यांनाच पसंती दिली होती, पण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून राजू लाटकर यांची निवड करण्यात आली. गेल्या नऊ महिन्यांत लाटकर यांनी शहराची कार्यकारिणी केलेली नाही, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. याउलट जिल्हाध्यक्षांनी जिल्हा कार्यकारिणीसह तालुका कार्यकारिणी पूर्ण करून त्यांना सक्रिय केले आहे. शहराच्या कार्यकारिणीला अद्याप मुहूर्त मिळत नाही. त्याचबरोबर शहरातील निर्णय घेताना जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाते, अशी भावना आर. के. पोवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक नेत्यांकडे याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करत असल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रविवारी सकाळी आर. के. पोवार समर्थकांची बैठक पन्हाळगडावर झाली. यामध्ये कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांच्या कारभाराचा पाढाच वाचला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तळागाळातील कार्यकर्त्यांनी घाम गाळल्यानेच पक्ष वाढला, पण त्याच कार्यकर्त्यांना कोणी बेदखल करत असेल, तर ते सहन केले जाणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्याचे समजते. पक्षाध्यक्ष शरद पवार १७ व १८ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोवार समर्थकांची झालेली बैठक महत्त्वाची आहे. १८ जानेवारीला सकाळी पवार यांची भेट घेऊन कार्यकर्ते मनातील खदखद व्यक्त करणार असल्याचे समजते. कार्यकर्त्यांच्या खदखदीची दखल नेत्यांनी घेतली नाही, तर भविष्यात पक्षांतर्गत उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीला माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला शहराध्यक्षा वहिदा मुजावर, अनिल घाटगे, निरंजन कदम, लाला जगताप, गणपतराव बागडी, पद्मा तिवले, जयकुमार शिंदे, सुनील देसाई, रमेश पोवार यांच्यासह शंभरहून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांसमवेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पन्हाळगडावर आयोजित केला होता. त्यासाठी सगळे एकत्र आले होते, दुसरे कोणतेही कारण नाही. - आर. के. पोवार, माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस