शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न

By admin | Updated: September 4, 2014 00:22 IST

कॉँग्रेसचा प्रतिसाद नाही : जि. प. पदाधिकारी निवड

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकत्रित यावे, यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सदस्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये शेवटच्या टप्प्यांत असाच प्रयोग होऊन राष्ट्रवादीने मित्रपक्षांना सोडून कॉँग्रेसला बरोबर घेतले होते. यावेळी कॉँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेणार का? हे महत्त्वाचे आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बांधकाम सभापतिपद देत सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस फारच बॅकफूटवर गेली. त्यांचे अवघे सोळा सदस्य निवडून आल्याने त्यांनी सत्ता स्थापन्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. आता नवीन आरक्षणानुसार अध्यक्ष निवड २१ सप्टेंबरला होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपदांसाठी कॉँग्रेस सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचे सदस्य जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. जिल्हा परिषदेतील आघाडीसाठी दोन्ही कॉँग्रेसमध्ये जिल्हा पातळीवर एकमत होईल, असे वाटत नाही; पण प्रदेश पातळीवरून सूचना आल्या तर आघाडीचा विचार होऊ शकतो. त्यासाठीही शेवटच्या टप्प्यांत प्रयत्न होऊ शकतात. (प्रतिनिधी)