शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

‘शिस्ती’त होणार राष्ट्रवादीचा ‘निर्धार’

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

पुष्पगुच्छ नव्हे तोंडीच स्वागत : नवीन प्रदेशाध्यक्षांचे फर्मान

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निर्धार मेळाव्यासाठी विशिष्ट नियमावली बनविली आहे. नेत्यांचे स्वागत, फ्लेक्स (बॅनर) चे डिझाईनपासून व्यासपीठावर बसायचे कोणी, याचे फर्मानच प्रदेशाध्यक्षांनी काढले आहे. या शिस्तीच्या फर्मानाने कार्यकर्त्यांना मात्र उत्साहाला मुरड घालावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली असून, जिल्हानिहाय निर्धार मेळावे घेण्यात येणार आहे. राज्यात नंबर वन होण्यासाठी मतदारसंघनिहाय बांधणी सुरू आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मेळावा म्हटले की, नेत्यांचे जंगी स्वागत, स्वागतासाठी भला मोठा पुष्पहार, फटाक्यांची आतषबाजी, सभास्थळी छबी झळकण्यासाठी कार्यकर्त्यांची डिजिटलच्या माध्यमातून सुरू असलेली स्पर्धा, व्यासपीठावरील डिजिटलवरीलही नेत्यांची भाऊगर्दी उसळते. तालुकाध्यक्षांपासून जिल्हा कार्यकारिणी सदस्य, प्रांतिक सदस्य, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, संपर्कमंत्री यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण होते. पण, या गोष्टींना तटकरे यांनी फाटा द्यायचे ठरविले आहे. ज्यासाठी आपण येणार आहे, तो उद्देश साध्य होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मेळाव्यासाठी स्टेजमागील प्लेक्सचे डिझाईन प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. त्यावर पालकमंत्री, संपर्क मंत्रीशिवाय इतर कोणाचेही फोटो असणार नाहीत. स्टेजवर मोजक्याच खुर्च्यां असतील. प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत तोंडी अथवा एक पुष्पगुच्छ देऊन करायचे आहे. मोठे हार, फुलांचे गुच्छ, शाली पूर्ण बंद. प्रदेश राष्ट्रवादीने तयार केलेल्या गीतांचा वापर मेळाव्यापूर्वी होईल. प्रदेशाध्यक्षांच्या आचारसंहितेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्साहाला मुरड घालावी लागेल. कार्यकर्त्यांचे म्हणणेच ऐकून घेणार नसाल, तर मेळावा कसला, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. नवीन अध्यक्ष, नवीन नियमावली, असे समजावण्याचा प्रयत्न नेते करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जिल्हाध्यक्षांनी समजून घ्यायच्या व त्यांनीच त्या मेळाव्यात मांडण्याचे आदेशही प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.