शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग, इतिहासात पुढे; विकासात माग

By admin | Updated: December 13, 2014 00:14 IST

पारगड : शासन व पर्यटन विभागाच्या दुर्लक्षांमुळे विकासापासून वंचिते

चंदगड-नंदकुमार ढेरे दगडला प्रति मिनी महाबळेश्वची ओळख निर्माण करून देणारा ऐतिहासिक किल्ले पारगड सुविधांअभावी आजही प्राथमिक अवस्थेत आहे. शासन व पर्यटन विभागाच्या दुर्लक्षांमुळे हा किल्ला विकासापासून वंचित राहिला आहे. केवळ पारगडचा विकास केल्याचा दावा आजपर्यंत अनेकांनी केला. मात्र, प्रत्यक्ष पारगडावर जाऊन पाहिले असता, पारगड मूळ रूपातच पाहायला मिळेल.रायबा मालुसरे होता किल्लेदारतानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याची गडावर नेमणूक केली होती. १६८९ च्या दरम्यान मुगल शहजादा मुआज्जम व खावासखान यांच्या आक्रमणात महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे शहीद झाले होते. तानाजी मालुसरे, विठोजी माळवे यांचे वंशज, शेलार, गडकरी तसेच इतर कुटुंबे महाराजांची आज्ञा म्हणून आजही या गडावर वास्तव्य करून आहेत. उदरनिर्वाहासाठी बहुतेक तरुण वर्ग मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या ठिकाणी वास्तव्य करून आहेत. सध्या गडावर फक्त ४0 ते ५0 कुटुंबांचे वास्तव्य असून, या घरांमध्ये फक्त वृद्ध महिला व पुरुष पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात पारगडचा विकास करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी केले होते. पर्यटन आणि निसर्गसौंदर्यामुळे हा भाग मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातोे. कोदाळीचे प्राचीन माऊली मंदिर, तिलारीचा अवघड घाट, नागमोडी वळणे, रातोबा पॉर्इंट, हिल्स, कॅनॉल, वीजघर, तिलारी डॅम, ड्रिमलँड पॉर्इंट (स्वप्निल पॉर्इंट), पारगडच्या ३६० पायऱ्या, प्रवेशद्वार, शिवकालीन तोफा, हनुमान मंदिर, भवानी मातेचे मंदिर, मंदिरातील शिवकालीन चित्ररूपी इतिहास, गडावर खोदलेल्या १७ विहिरी (सध्या चार विहिरी आहेत), टेहळणी बुरूज, भुयार, इत्यादींमुळे हा गड शिवकालीन इतिहास उभा करतो. गडावरील सोयपारगड परिसर पाहण्यासाठी चंदगडपासून एस.टी.ची सोय आहे. दुचाकी, चारचाकी वाहने गडावर जाऊ शकतात. गडावर पर्यटकांना राहण्यासाठी ग्रामस्थांनी भक्त निवासाची सोय केली आहे. तसेच कोदाळी ग्रामस्थांच्या देखरेखाली वन खात्याचे ग्रीन व्हॅली रिसोर्ट उभारले आहे. येथे सर्व सुविधा आहेत. पर्यटकांना हा भाग पावसाळ्यात, हिवाळ्यात व उन्हाळ्यातही पर्यटनासाठी खुणावत आहे.गडाचे स्थानचंदगड तालुक्यात पारगड, कलानंदीगड, महिपाळगड,व गंधर्वगड हे चार गड शिवकालीन असून, छ. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहेत. या चारच किल्ल्यांपैकी चंदगडपासून साधारणत: ३५ कि. मी. अंतरावर पारगड आहे. शिवाजी महाराजांनी सिद्धी, पोर्तुगीज व डच आदींपासून स्वराज्याचे संरक्षण व्हावे म्हणून सागरी किल्ले उभारले. गोव्यातील पोर्तुगीजांवर नजर ठेवण्यासाठी पारगड व कलानंदीगडची उभारणी केली. प्रसिद्धीची गरजपारगड निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वाची खाण आहे. वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये येथे पर्यटनाचा आनंद घेता येतो; पण या गडाबाबत राज्यपातळीवर फारशी प्रसिद्धी नाही. पर्यटन विकासमंडळाने येथील नैसर्गिक विपुलता आणि याच्या ठिकाणाचे महत्त्व केंद्रस्थानी योग्य मार्के टिंग केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक आकर्षित होतील. ट्रेकिंग, जंगल सफारी अशा साहसी प्रकारांची आवड असणाऱ्यांसाठी हे नवे डेस्टिनेशन ठरू शकते.पारगडला हे हवे...ढासळलेल्या तटबंदीचे ाुनर्बांधकाम२) पर्यटकांसाठी टेन्ट हाऊस बांबू पॅलेस)३) हॉटेलची सोयस्विमिंग पूल ४गार्डन ४रोप वेगिर्यारोहण, आदी सोयी पर्यटन विभागाच्यावतीने करणे शक्य.किल्ले पारगडचे वेगळेपण...इ.स. १६व्या शतकात उभारण्यात आलेल्या पारगडची खासीयत वेगळीच आहे. घणदाट अरण्य, दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, खोल दऱ्या, दूरवर पसरलेला गोव्याचा समुद्र किनारा, आकाशाला स्पर्श करू पाहणारी ताडा-माडांची झाडे, अंगाला झोंबणारा वारा, धबधबे, तसेच वन्यजीवांचे दर्शन होते.निसर्गाने पारगड ते कलानंदीगडच्या परिसराला भरभरून देणगी दिली आहे. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकाला हा परिसर मोहित करून सोडतो. सिंधुदुर्ग व गोव्याजवळ असलेला पारगड किल्ला साधारणत: ४८ एकरांमध्ये वसविण्यात आला होता.समुद्रसपाटीपासून २५०० फूट उंचीवर हा गड असून, स्वराज्याच्या शत्रू सैन्यांना कधीही जिंकता न आल्याने पारगडला अजिंक्यगड म्हणून ओळखले जाते. तसेच स्वराज्याच्या शेवटच्या टोकावर हा गड असल्याने त्याचे नाव पारगड ठेवण्यात आले आहे. गडाची वास्तू ते प्रवेशापर्यंत स्वत: महाराज या किल्ल्यावर राहिले होते. महाराजानी सूर्य, चंद्र असे तोपर्यत या गडाचे रक्षण करावे, असा आदेश सहकाऱ्यांना दिला होता.