शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची रणनीती अधिकच आक्रमक !

By admin | Updated: October 13, 2015 00:22 IST

फलटणमध्ये गुप्त बैठक : जिल्ह्यातील आमदारांना अजित पवार यांचा कानमंत्र

फलटण : फलटण दौऱ्यावर बऱ्याच कालावधीनंतर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील आमदारांची गुप्त बैठक घेऊन पक्षवाढीसह आगामी आंदोलनाची रणनीती ठरविली. फलटणमधील एका नगरसेवकाच्या आलिशान फार्महाऊसवर सोमवारी सायंकाळी ही बैठक घेऊन अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना कानमंत्र दिला.सत्तेबाहेर असल्याने जिल्ह्यातील विकासकामांवर काय परिणाम होतोय व त्यातून काय मार्ग काढायचा याविषयी या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध माध्यमांतून विरोधकांचा शिरकाव होणार नाही, याकडे लक्ष देण्याचा व विरोधकांचे आक्रमण परतावून लावण्याचा संदेशही पवार यांनी यावेळी दिला.पक्षवाढीसाठी आणखी काय करता येईल?, विविध आंदोलने पूर्व ताकदीने कशी उभारायची?, याविषयीही चर्चा झाली. फलटण तालुक्यात एकहाती सत्ता ठेवणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा व त्यावरील उपाययोजनेचा आढावा घेताना अजित पवार यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी विविध आमदारांची मते त्यांनी ऐकून घेतली. भविष्यात अधिक आक्रमकपणे काम करावे लागणार असल्याने त्या पद्धतीने तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे समजते. जिल्ह्यातील आगामी राजकारणाची रणनीती फलटणमधून अजित पवार यांनी ठरविली, असेही सांगितले जात आहे.घारीप्रमाणे लक्षविधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारला मतदारांनी बाजूला सारून भाजप-शिवसेनेची सत्ता आणली. सातारा जिल्ह्याने मात्र राष्ट्रवादीला साथ दिली. याचे फलित म्हणून रामराजेंना विधानपरिषदेचे सभापतिपद देण्यात आले. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर काका-पुतण्यांचे घारीप्रमाणे लक्ष असल्याचेच आता स्पष्ट होऊ लागले आहे.