शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय स्पर्धांचा ‘डबलबार’

By admin | Updated: April 16, 2015 00:00 IST

एप्रिल महिन्यात फिव्हर : लॉन टेनिस, खो-खो स्पर्धा

सांगली : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सांगलीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा डबलबार उडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील नामांकित खेळाडूंचे दर्शन या स्पर्धेतून सांगलीकरांना होणार आहे. २२ ते २५ एप्रिलदरम्यान १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलमध्ये होणार आहेत. संकुलात नव्याने बांधण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन या स्पर्धेने होणार आहे. क्रीडाधिकारी कार्यालयाने ८० लाख रुपये खर्च करून संकुलात सहा लॉन टेनिसची मैदाने बांधली आहेत. यापैकी दोन खुल्या गटासाठी व चार शालेय खेळाडूंसाठी आहेत. प्रेक्षकांसाठी भव्य गॅलरीही बांधण्यात आली आहे. यापूर्वी २००६ मध्ये सांगलीत राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा झाली होती. लॉन टेनिस स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक आणि त्यांच्या पथकाची धावपळ सुरू आहे. २१ ते २५ एप्रिल दरम्यान कुपवाडमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धा होणार आहेत. शिवप्रेमी मंडळाच्या मैदानावर किशोर-किशोरी व पुरुष-महिला अशा दोन गटांत या स्पर्धा होतील. खो-खोपटूंचे गाव म्हणून कुपवाडची ओळख आहे. यापूर्वी कुपवाडमध्ये एक राज्यस्तरीय व एक महापौर चषक खो-खो स्पर्धा झाली आहे. शिवप्रेमी मंडळ स्पर्धेचे मुख्य संयोजक आहेत. ‘आपलं खो-खो लय भारी’ अशी या स्पर्धेची कॅचलाईन तयार करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी एकूण पाच मैदाने तयार करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय स्पर्धांचा तडाका२२ ते २५ एप्रिलदरम्यान राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा २१ ते २५ एप्रिलदरम्यान राष्ट्रीय खो-खो स्पर्धा देशभरातील नामांकित खेळाडूंची उपस्थितीऐंशी लाखांच्या लॉन टेनिस मैदानाचे उद्घाटन