शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘नाठाळा’च्या माथी हाणू काठी !

By admin | Updated: February 3, 2015 23:58 IST

वारकऱ्यांचा इशारा : ‘एव्हीएच’विरोधात भजन आंदोलन; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कँडल मार्च

चंदगड/गडहिंग्लज : बा रे पांडुरंग केव्हा भेट देशी, झालो मी परदेशी तुजविन। का माझा विसर पडिला माय-बापा, सांडियेली कृपा कवण्यागुणे।। कैसा कंटोनिया राहू हा संसार। काय एक धीर देऊया मना।। भले तरी देऊ काशेची लंगोटी, ‘नाठाळा’च्या माथी हाणू काठी।। अशा अभंगांच्या माध्यमातून वारकऱ्यांनी, तर पेटलेल्या मेणबत्त्या हाती घेऊन कँडल मार्चद्वारे महाविद्यालयीन युवक-युवतींनी ‘एव्हीएच’ कंपनीला ‘चंदगड छोडो’चा इशारा मंगळवारी (दि. ३) दिला.विनाशकारी एव्हीएच प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील वारकऱ्यांच्या सुमारे ५०० दिंड्या सकाळी पाटणे फाट्यावर आल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात कंपनीच्या प्रकल्पस्थळापर्यंत आणि प्रवेशद्वारी ठिय्या मांडून त्यांनी निरनिराळ्या अभंगातून कंपनीला चंदगड सोडण्याचा इशारा देत माय-बाप सरकारला साकडे घातले.सायंकाळी पेटलेल्या मेणबत्त्या हाती घेऊन पाटणे फाट्यापासून हजारो महाविद्यालयीन मुला-मुलींनी कंपनीच्या कार्यस्थळापर्यंत कँडल मार्च काढला. कंपनीच्या गेटवर त्यांनी बसून निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.आंदोलनात आमदार संध्यादेवी कुपेकर, कृती समितीचे अध्यक्ष प्रा. एन. एस. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, डॉ. बी. एल. पाटील, रामराजे कुपेकर, अशोक देसाई, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पाटील, पंचायत समितीच्या सदस्या अनुराधा पाटील व नंदिनी पाटील, अ‍ॅड. संतोष मळवीकर, दिशा सामाजिक संस्थेच्या विद्या तावडे, विष्णू गावडे, अमर चव्हाण, गजानन पाटील, बसवंत अडकूरकर, प्राचार्य पी. आर. पाटील, प्रा. पी. ए. पाटील, शिवाजी सावंत, तुकाराम वार्इंगडे, संजय पाटील, नारायण गावडे, सोमनाथ हारकारे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)