पेठवडगाव : पेठवडगाव नगरपालिकेत सर्व नगरसेवकांची प्रभागवार नावांची पाटी लावण्यात आली आहे. सध्या पालिकेत एका जागेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. यावेळी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या नावापेक्षा स्वीकृत नगरसेवकाचे नाव मोठ्या, ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे. हा चर्चेचा विषय झाला आहे. पालिकेत नगराध्यक्ष, १७ नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक असे लोकप्रतिनिधी म्हणून कारभार पाहतात. दोन्ही जागा युवक क्रांती आघाडीच्या वाट्याला आल्या आहेत. यांतील एका जागेसाठी सहा महिन्यांत एक स्वीकृत असे धोरण ठरविले आहे. या पदावर प्रकाश बुचडे, रमेश शिंपणेकर, प्रजापती सनदी, गौतम गोंजारे, दीपक खरोसे, दशरथ पाटील यांना संधी दिली आहे. मात्र यावेळी निवड झालेल्या दशरथ पाटील यांचे दर्शनी फलकावर नाव ठळक अक्षरांत छापले आहे. हा एक चर्चेचा विषय झाला आहे; तर काहींकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
०२ वडगाव नेम प्लेट
फोटो ओळ पेठवडगाव : पेठवडगाव पालिकेत स्वीकृत नगरसेवक दशरथ पाटील यांचे नाव दर्शनी फलकावर असे मोठे लावण्यात आले आहे.