शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नागदेववाडी, वडणगेला मलेरियाचा विळखा

By admin | Updated: September 18, 2015 00:33 IST

आरोग्य विभाग हतबल : तीन महिन्यांपासून फैलाव, सध्या १६५ रुग्ण

कोल्हापूर : शहरालगत असलेल्या करवीर तालुक्यातील नागदेववाडी, वडणगे ही दोन गावे गेल्या तीन महिन्यांपासून मलेरियाच्या विळख्यात आहेत. साथ पूर्णपणे आटोक्यात येत नसल्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे. परिणामी, हा आजार हद्दपार करणे हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे. शहरापासून पाच किलोमीटरच्या आत ही गावे आहेत. वडणगेची लोकसंख्या ११ हजार ९९८, तर नागदेववाडीची लोकसंख्या १८९० आहे. दोन्ही गावांत सेंट्रिंग व्यवसाय व बांधकाम कामगार यांची संख्या अधिक आहे. जूनपासून या दोन्ही गावांत हिवताप, मलेरियाचे रुग्ण मोठ्या संख्येने मिळत आहेत. शासनाचे आरोग्य पथक सक्रिय आहे. वेळीच उपाययोजनाही सुरू केल्या; परंतु रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणा चक्रावून गेली आहे. साथ पूर्णपणे आटोक्यात आणणे आव्हानात्मक बनले आहे. प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्वरित उपचारांची सेवा दिली जात आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होत असतो. यामुळे बहुतांश कुटुंबांचा पाणी साठवून ठेवण्याकडे कल आहे. साठविलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होत आहे. डासांच्या माध्यमातून हिवताप, मलेरिया फैलावत आहे. ग्रामस्थांना, साठविलेले पाणी झाकून ठेवा, कोरडा दिवस पाळा, डासांपासून वैयक्तिक संरक्षण करा, घराशेजारी पडलेल्या वाहनांच्या विनावापराच्या टायरची विल्हेवाट लावा, स्वच्छता ठेवा, असे आवाहन आरोग्य पथक करीत आहे. १६५ रुग्णदोन्ही गावांत सध्या मलेरियाचे १६५ रुग्ण आहेत. थंडी, ताप ही लक्षणे आहेत. सात दिवसांपेक्षा अधिक काळ ही लक्षणे राहिल्यास रुग्णांची प्रकृती खालावते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच संबंधित रुग्णांनी रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. परंतु, दोन्ही गावांतील मलेरियाच्या रुग्णांची मानसिकता त्वरित उपचार न घेण्याची झाल्याचे आरोग्य प्रशासनाने निष्कर्ष काढला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वडणगे, नागदेववाडी गावांत मलेरियाचे रुग्ण आहेत. आरोग्य पथकांद्वारे प्रत्येक घरांचा सर्व्हे केला आहे. जागृतीही केली आहे, तरीही या दोन गावांतील मलेरिया पूर्णपणे आटोक्यात येत नाही. आजार आटोक्यात येण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे.- संतोष तावशी,जिल्हा साथरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी