शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा दांडक्याने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2015 01:04 IST

म्हाळुंगे तर्फ बोरगावची घटना : मोबाईल न दिल्याने कृत्य; आरोपीस अटक

पन्हाळा : म्हाळुंगे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथे मोबाईलवरून फोन करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाचा खून केल्याची घटना घडली. कृष्णात बापू पाटील असे खून झालेल्याचे नाव आहे, तर खूनप्रकरणी त्याचा मित्र शरद कांबळे यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, म्हाळुंगे तर्फ बोरगाव गावातील कृष्णात बापू पाटील व शरद दिनकर कांबळे हे दोघे मित्र होते. हे दोघे शुक्रवारी सायंकाळी गावाजवळील हॉटेलमध्ये जेवावयास गेले होते. जेवण करून गावच्या तालमीच्या कट्ट्यावर बसले होते. यातील शरद याच्या शेतात मशागत करण्याकरिता औत पाहिजे होते. त्याकरिता शरदने कृष्णात यांना जवळच्या महाडिकवाडी गावातील औतवाल्यास फोन करण्याची विनंती केली. मात्र, कृष्णात यांनी आपल्या फोनवर बॅलन्स नसल्याचे सांगितले. त्याचा शरदला राग आला. जवळच पडलेला लाकडी दांडका त्याने कृष्णात यांच्या डोक्यात घातला. कृष्णात त्याच अवस्थेत घरी गेला. त्याच्या जखमेतून रक्तस्राव झाल्याने सकाळी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, पण उपचारापूर्वीच तो मृत झाला. आरोपी शरद कांबळे हा घरी झोपला होता. त्याला सकाळी अटक करण्यात आली. दोघांनी मद्यपान केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी किसन गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)