शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बानगेतील कुस्ती कलेला मुश्रीफांची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

दत्ता पाटील म्हाकवे : कुस्ती पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या बानगे (ता.कागल) येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहाराष्ट्र केसरी ...

दत्ता पाटील

म्हाकवे : कुस्ती पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या बानगे (ता.कागल) येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नातून क्रीडा संकुल उभारण्यासाठी पाच कोटीच्या निधीला मान्यता मिळाली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात एक कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वप्नवत असणाऱ्या क्रीडासंकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुस्ती प्रशिक्षकांच्या नियुक्तीसह मुले व मुलींना सराव, जेवणाची व्यवस्था असे सर्व सोयींनीयुक्त जिल्ह्यातील एकमेव कुस्ती संकुल होत असल्याने येथील कुस्तीला बळ मिळणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील उदयोन्मुख मल्लांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मुश्रीफ यांनी स्वतःहूनच हा प्रस्ताव कार्यकर्त्यांकडून मागवून घेतला होता.

मोडकळीस आलेल्या हनुमान मंदिरातच एका बाजूला १० बाय १०च्या जागेत तालीम आहे. कोणत्याही सुविधा नसतानाही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कुस्तीचे धडे घेत अनेक मल्लांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी केली आहे. यामुळे ५० हून अधिकजण रेल्वे, पोलीस, सैन्यात भरती होऊन स्वावलंबी बनले आहेत.

दरम्यान, हे क्रीडा संकुल प्रशस्त जागेत तीन मजली होणार असून पहिल्या मजल्यावर मातीचा आखाडा, दुसऱ्यावर मल्लांना राहण्याची व्यवस्था, तिसऱ्या मजल्यावर मँटचा सराव होणार आहे. यासाठी उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, संतराम पाटील, राजू पाटील, विलास पाटील, प्रकाश कदम, तुकाराम चोपडे, मेहबूब मुजावर यांनी परिश्रम घेतले.

एक एकर जमीन केली दान

संकुल उभारणीसाठी मुबलक जागेची गरज होती. त्यामुळे रवींद्र पाटील यांनी कै. आण्णासो पाटील यांच्या स्मरणार्थ एक एकर जमीन यासाठी देऊ केली. पाटील कुटुंबीयांच्या दातृत्वामुळे बानगेकरांचे हे स्वप्न पूर्ण होण्याच्या आशा बळावल्या आहेत.

कुस्तीप्रेमी मुश्रीफ

छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेली कुस्ती कला जिवंत राखण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे तालुक्यातील गरीब मल्लांना आधार देण्याच्या हेतूने हे संकुल उभारण्याचा मुश्रीफ यांचा मानस आहे. २००७ मध्ये बानगेतील कुस्ती मैदानाच्या उद्घाटनाला अधिवेशनातून थेट हेलिकॉप्टरमधून हजेरी लावली होती. मुश्रीफ यांच्या कुस्तीवरील प्रेमामुळेच बानगे पंचक्रोशीतील मल्लांना अच्छे दिन येत असल्याच्या भावना रवींद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.