शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता पतीचा खून पत्नीकडून

By admin | Updated: February 8, 2015 00:49 IST

अनैतिक संबंधातून कृत्य : सूपारी दिली : प्रियकरासह तिघांना अटक

कुरुंदवाड : सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता म्हणून दाखल झालेल्या याकूब भाऊसोा तिवडे (वय ३६, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) याचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना कुरुंदवाड पोलिसांनी आज (शनिवार) उघडकीस आणली. पत्नी ज्योती तिवडे, तिचा प्रियकर बाजीराव बापू बोराडे (२६, रा. हातकणंगले), जितेंद्र सुरेश तांबट (३०, रा. कोल्हापूर) यांना पोलिसांनी अटक केली, तर खुनामध्ये सहभागी असलेला राहुल सोनुले (रा. कोल्हापूर) हा फरार आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, याकूब तिवडे याचा टेम्पोचा व्यवसाय होता. २ सप्टेंबर २०१४ रोजी टेम्पो व त्याच्या चपला नांदणी-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील पुलावर आढळल्या. त्यामुळे पती बेपत्ता झाल्याची फिर्याद पत्नी ज्योती हिने कुरुंदवाड पोलिसांत दिली होती. कुरुंदवाड पोलीसाच्या गुन्हे तपास पथकाला तिवडेचा खून झाल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता पत्नी ज्योती तिवडे हिचे आरोपी बाजीराव बोराडे याच्याशी अनैतिक संबंध होते. मात्र, या संबंधात अडथळा येत असल्याने पतीचा अडसर दूर करण्यासाठी खुनाचा कट रचण्यात आला. १ सप्टेंबर २०१४ रोजी बाजीराव खोराडे, जितेंद्र तांबट व राहुल सोनुले यांनी याकूबला रात्री शहापूर येथील दारूदुकानात नेऊन दारूमध्ये गुंगीच्या गोळ्या घालून त्याला बेशुद्ध केले. त्याच्याच टेम्पोतून नांदणी पुलावरून त्याला नदीमध्ये ढकलण्यात आले. टेम्पो व चपला तिथेच ठेवून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला; मात्र पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पत्नी ज्योती तिवडेचा प्रियकर बोराडे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच खुनाची कबुली दिली. तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.