शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा टॉवर येथे तरुणावर खुनी हल्ला

By admin | Updated: April 19, 2015 01:17 IST

उसने घेतलेले पैसे मागितल्याच्या रागातून हल्ला

कोल्हापूर : उसने घेतलेले तीस हजार रुपये मागितल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी गजाने खुनी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये महेंद्र बापू भोरे (वय ३०, रा. शहाजी वसाहत) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्राने त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, जखमी भोरे याने संशयित सचिन अशोक पाटील (रा. रंकाळा टॉवर) याच्यासह चौघांनी आपल्याला जातिवाचक शिवीगाळ करून हल्ला केल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत महेंद्र भोरे याने सांगितले, मी टॅम्पोचालकाचे काम करतो. व्यवसायातून सचिन पाटील याच्याशी ओळख झाली. त्यातून आम्ही दोघे मित्र झालो. सचिन याने माझ्याकडून दीड महिन्यापूर्वी तीस हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे मागत असल्याने त्याने मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे मी व मित्र रवींद्र केसरकर यालाघेऊन रंकाळा टॉवर येथे गेलो. या ठिकाणी सचिन हा अन्य मित्रांसोबत थांबला होता. त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने जातिवाचक शिवीगाळ केली. दोघांची वादावादी पाहून त्याचे मित्र त्या ठिकाणी आले. त्यांनी मारहाण करीत माझ्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून ते निघून गेले. तेथून मित्राने मोटारसायकलवरून एका खासगी रुग्णालयात नेले. या ठिकाणी डॉक्टरांनी सीपीआरला जाण्यास सांगितले. सीपीआरमध्ये जखम पाहून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. या हल्ल्याची माहिती समजताच माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे यांच्यासह नातेवाईक व मित्रांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. याप्रकरणी संशयितासह चौघांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)