कोल्हापूर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील वैयक्तिक, संस्था व शासकीय अशा २०० खातेदारांनी ९ कोटी ७० लाखांपेक्षा अधिकची रक्कम थकविली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने १६ लाखांची, पोलीस प्रशासनाने तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांची थकविली आहे. थकबाकीदारांचा येत्या १५ दिवसांत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे.महापालिकेने ५० हजारांपेक्षा अधिकची पाणीपट्टी थकबाकी असलेल्या खातेदारांविरोधात मोहीम उघडली आहे. २०० बड्या खातेदारांत १००हून अधिक खातेदार ही शासकीय कार्यालये आहेत. महापालिका कारवाई करणार नाही या समजुतीने कार्यालयांनी २० लाखांपर्यंत थकबाकी ठेवली आहे. थकबाकीमध्ये बाजार समिती, पीडब्ल्युडी, मयूर दूध संघ, शिवाजी विद्यापीठ, सीपीआर, हॉटेल शालीनी पॅलेस, व्हिक्टर पॅलेस, कोल्हापूर शुगर मिल, हिंदुस्तान पेट्रोलियम, झुम डेव्हलपर्स, मेरी वॉनलेस हॉस्पिटल, चित्रनगरी आदींचा समावेश आहे.
मनपाची १० कोटींची पाणीपट्टी थकीत
By admin | Updated: July 12, 2014 00:56 IST