कसबा बावडा येथील छत्रपती शंभुराजे फ्रेंडस् सर्कलच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेमध्ये मुंबईच्या ओंकार नेटके याने विजेतेपद पटकावले. त्याला रोख रुपये २१ हजार व चषक कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला, तर मुंबईच्याच राजेश गोयल याने उपविजेतेपद पटकावले. त्याला ११ हजार रुपये व चषक मिळाला. स्पर्धेत एकूण २५० जणांनी भाग घेतला होता.
२४ ते २६ जानेवारीअखेर पार पडलेल्या या स्पर्धेत स्थानिक कोल्हापूरसह मुंबई, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, इचलकरंजी या ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील इतर विजेते पुढीलप्रमाणे- उत्कृष्ट खेळाडू- श्रुती वेळेकर (पुणे), प्रथम ओपन टू फिनिश- किशोर बोंडवे (पुणे), प्रथम ब्लॅक टू फिनिश- सुनील चव्हाण (कोल्हापूर) यांनी यश मिळवले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे उपसभापती संतोष ठाणेकर, ॲड. नीलेश नरुटे, विनायक कारंडे, गजानन बेडेकर, श्रावण फडतारे, सुनील जाधव, सचिन पाटील उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन शिवाजी एकशिंगे, प्रवीण पाटील, बाजीराव माने, सुनील पाटील, प्रशांत माने, गणेश रकटे, युवराज माने, नितीन पाटील, विनायक माने, सुजल माने, महेश माने, ओंकार भोसले आदींनी केले.
फोटो २९ बावडा कॅरम स्पर्धा
कॅप्शन -
छत्रपती शंभुराजे फ्रेंडस् सर्कल आयोजित कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेल्या ओंकार नेटके याला चषक प्रदान करताना आमदार ऋतुराज पाटील. यावेळी मोहन सालपे, ॲड. नीलेश नरुटे, सचिन पाटील, विनायक कारंडे आदी उपस्थित होते.