शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

परिचारकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन : शिवाजीराव परुळेकर

By admin | Updated: March 11, 2017 15:32 IST

एक लाख पोस्टकार्डे मुख्यमंत्र्यांना पाठविणार

परिचारकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन : शिवाजीराव परुळेकरकोल्हापूर : पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत माजी सैनिकांचे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.परुळेकर म्हणाले, प्रशांत परिचारकांनी सैनिकांबद्दल केलेले बेताल वक्तव्य हे विकृत मानसिकतेचे प्रतिक आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होउन त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. भविष्यात ते अधिक तीव्र केले जाईल. परिचारकांनी ही घटना घडल्याचे स्वत: मान्य करुनही या घटनेची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमून केवळ दीड वर्षासाठी निलंबन करणे म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा आहे. त्यामुळे परिचारकांची आमदारकी त्वरीत रद्द करावी. त्यांच्या सर्व शासकीय सुविधा, मानधन, भत्ते, कमिट्यांवरील पद रद्द करावे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून मागण्यांची एक लाख पोस्टकार्डे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पाठविली जाणार आहेत.