शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांसाठी हालचाली

By admin | Updated: December 11, 2014 00:33 IST

इचलकरंजी नगरपालिका : इच्छुक नगरसेवकांची फिल्डिंग; २२ डिसेंबरला निवडणूक

इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी घोषित केला आहे. समित्यांच्या निवडणुका २२ डिसेंबरला होणाऱ्या विशेष सभेमध्ये होणार आहेत. नगरपालिकेत राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशा दोन्ही कॉँग्रेसची आघाडी सत्तेत आहे. तर मागील आठवड्यापासूनच समित्यांच्या सभापतिपदासाठी वर्णी लागावी म्हणून इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.इचलकरंजी नगरपालिकेकडे असलेल्या पाच विविध विषय समित्यांपैकी तीन समित्या कॉँग्रेस पक्षाकडे, तर दोन समित्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे आहेत. कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता, महिला व बालकल्याण या समित्या असून, राष्ट्रवादीकडे बांधकाम आणि शिक्षण-क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती आहे. यापैकी पाणीपुरवठा व बांधकाम या दोन्ही समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने या दोन समित्यांकडे सभापती म्हणून आपलीच वर्णी लागावी, यासाठी दोन्हींकडील नगरसेवकांच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. सोमवारी (दि. २२) निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असून, या निवडणुकीसाठी होणाऱ्या विशेष सभेच्या अध्यक्षपदी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे आहेत. नगरपालिकेतील पक्षनिहाय नगरसेवकांच्या संख्येनुसार मिळालेल्या कोट्याप्रमाणे संबंधित पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी या समित्यांच्या सदस्यांची नावे मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे द्यावयाची आहेत. त्यानंतर दुपारी २ ते ३ या वेळेत समित्यांच्या सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी होऊन उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्धा तास देण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास चार वाजता होणाऱ्या विशेष सभेत समित्यांची निवड जाहीर केली जाईल.विविध समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसमध्ये असलेली आघाडी संपुष्टात यावी, यासाठी राष्ट्रीय कॉँग्रेसचे काही नगरसेवक हालचाली करीत होते. त्याला पक्षश्रेष्ठींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आघाडीत बिघाडी होण्याच्या हालचालीसुद्धा थंडावल्या आहेत. त्यामुळे येणारी समित्यांची निवडणूक सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक समितीत १९ सदस्यइचलकरंजी नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ५७ आहे. त्यामुळे विविध विषय समित्यांमध्ये १९ सदस्य असतील. एका सदस्याला जास्तीत जास्त तीन समित्यांवर सदस्यत्व देता येईल. संख्या बलाबलानुसार समित्यांमध्ये कॉँग्रेसचे ११, राष्ट्रवादीचे २ व शहर विकास आघाडीचे ६ सदस्य असतील.