शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

सलग बाराव्या दिवशीही आंदोलकांचा ठिय्या

By admin | Updated: December 24, 2016 23:52 IST

तिलारी प्रकल्पग्रस्त : गोव्याचा पाणीपुरवठा बंदच

दोडामार्ग : एकरकमी अनुदानाची रक्कम करकपात न करता मिळावी यासाठी तिलारी धरणग्रस्तांनी कालव्यातच सुरू केलेले ठिय्या आंदोलन शनिवारी बाराव्या दिवशी सुरूच होते. प्रशासन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने गोव्याला पाणी सोडण्याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.तिलारी प्रकल्पग्रस्तांना एकरकमी अनुदान म्हणून देय असलेली पाच लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात करकपात करून जमा केली जात असल्याने प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करकपातीला विरोध दर्शविण्यासाठी कालव्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाने त्यावर अद्याप तोडगा न काढल्याने सतत बारा दिवस हे आंदोलन सुरू आहे. शासन देत असलेली रक्कम आमच्या हक्काची आहे. त्यापाठीमागे त्याग आहे त्यामुळे ती देताना करकपात करू नये, अशी आंदोलकांची मागणी आहे; परंतु त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामत: गोव्याचे पाणी बंद आहे. धरणग्रस्त आपल्या मागणीवर ठाम असल्याने गोव्याला पाणी सोडणार कसे, असा प्रश्न तिलारीच्या अधिकाऱ्यांसमोर आहे.पाणीप्रश्न होणार गंभीरतिलारी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन कालव्यांमधून गोव्यातील पेडणे, डिचोली या भागात पाणीपुरवठा केला जातो. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच या दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने पाणीपुरवठा बंद होता. हे काम १३ तारखेच्या आसपास पूर्ण झाले. मात्र, १३ पासूनच कालव्याच्या पात्रात प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केल्यामुळे पाणीपुरवठा बंदच आहे. त्यामुळे गोव्याकडे जाणारे पाणी साधारणपणे २५ दिवस बंद असल्याने गोव्यात पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.