लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिल वसुली केली जाणार असल्याच्या कारणास्तव वीज बिल विरोधी कृती समितीच्या वतीने वीज वितरण कंपनीला मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी वीज बिलाची होळी करण्यात आली. लॉकडाऊन काळात नोकरी आणि व्यवसायमध्ये आलेल्या मंदीमुळे वीज बिल भरणे अशक्य आहे, ही अन्यायकारक वीज बिल वसुली थांबवावी आणि बिल माफ करावे या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी चौकापासून एमएसईबी फाटा पर्यंत मोर्चा काढण्यात आला. एमएसईबी फाट्याजवळ वीज बिलाची होळी करण्यात आली. उपअभियंता माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विकास चोपडे, दीपक सकटे, नरेंद्र पाटील, अशोक गायकवाड, संतोष सुतार, राहुल साठे, सतीश दाभाडे, जहाँगीर गवंडी, नंदा सावंत, रेखा गायकवाड, भिमा महापुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोडोलीत वीज बिल विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST