कोल्हापूर : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह बहुतांशी महसूल विभागाचे अधिकारी पुण्याला रवाना झाले आहेत. त्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तुलनेत गर्दी कमी होती.
या दोन्ही मतदारसंघांसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर काही अधिकारी मतपेट्यांसह तातडीने पुण्याला रवाना झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार हे देखील मतमोजणीसाठी पुण्याला रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
ही मतमोजणी प्रक्रिया वेळखाऊ असल्याने यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे अधिकाधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना या मतमोजणी प्रक्रियेत सामावून घेण्यात आले आहे.