शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ८० फाईल्स प्रलंबित

By admin | Updated: March 4, 2017 00:34 IST

स्थायी सभा : सूत्रधार कोण, प्रशासनाला विचारला जाब

कोल्हापूर : कर्मचाऱ्यांच्या पगारातील फरकाची रक्कम देण्यावरून लाच मागण्याचा प्रकार महापालिकेत चांगलाच गाजला. याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत अप्रत्यक्ष उमटले. पैशासाठी आस्थापनातील कर्मचाऱ्यांकडे अशा किती फाईल्स प्रलंबित आहेत, यामागील मुख्य सूत्रधार कोण? असा जाब या सभेत विचारण्यात आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्राथमिक स्थितीत अशा कालबद्ध पदोन्नतीच्या ८० फाईल्स प्रलंबित राहिल्याचे उजेडात आले. प्रशासनाचा कारभार पारदर्शी करून तातडीने अशा फाईल्स निकाली काढण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार होते.कर्मचाऱ्याच्या पगारातील फरकाची रक्कम देण्यासाठी लाचेची मागणी करणारा पहारेकरी कुंदन लिमकर हा जाळ्यात सापडला होता. त्याच पार्श्वभूमीवर आस्थापना विभागात अनेक फाईल्स पैसे दिले नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आल्याबाबत जयश्री चव्हाण यांंनी प्रश्न उपस्थित केला. या विभागाचे खातेप्रमुख कोण आहेत? आस्थापना विभागाकडे अशा किती फाईल्स प्रलंबित आहेत, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. या प्रकरणाच्या चौकशीचीही त्यांनी मागणी केली. प्रशासनाने तातडीने तासाभरात आढावा घेतला. प्राथमिक स्थितीत सुमारे ८० प्रकरणांच्या फाईल्स प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले; पण आस्थापनातील अशा कालबद्ध पदोन्नतीबाबत अपुरी कागदपत्रे असल्याबाबत खुलासाही केला. तसेच ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले. अशा प्रकरणांत पारदर्शी कारभार असावा, अशाही अपेक्षा सदस्यांनी केल्या.वर्कशॉपमधील एम. डी. सावंत यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चौकशीअंती निलंबनाची कारवाई करू, असे एका प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले; तर शहरातील पाणीपुरवठ्यात पक्षपातीपणा होत असल्याने योग्य नियोजन करावे, झूम प्रकल्पावरील इनर्ट मटेरियल शिफ्टसाठी निविदा, प्लास्टिक पिशव्या विक्रीस बंदी या विषयांवरही मनीषा कुंभार, आशिष ढवळे, निलोफर आजरेकर, उमा इंगळे यांनी चर्चा केली.‘ती’ हॉटेल्स तपासणारहॉटेलमध्ये तयार होणारे सांडपाणी शहरातील सर्व हॉटेल्सनी ड्रेनेज लाईनला जोडल्याने ड्रेनेज लाईन तुंबत असल्याचे सभापती नेजदार, नीलेश देसाई, आशिष ढवळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे डे्रनेज लाईनवर ताण पडत आहे. हॉटेल व्यावसायिकांना स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्रे सक्तीची नाहीत का? असाही प्रश्न विचारला. त्यावर शहरातील ३७ हॉटेलची तपासणी झाली आहे. उर्वरित हॉटेलची तपासणी सोमवारपर्यत पूर्ण करू, असे प्रशासनाने सांगून त्यानुसार अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.