शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

अपुऱ्या सुविधांचा पर्यटकांना मन:स्ताप

By admin | Updated: May 23, 2015 00:42 IST

आंबा परिसर विकासासाठी निधी हवा : पर्यटन केंद्रासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

आंबा : कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबा हे निसर्गरम्य व थंड हवेचे पर्यटनस्थळ. जंगलातील गाव म्हणून शहरातील भांडवलदारांनी प्लॉटिंगच्या व्यवसायात येथे मोठी गुंतवणूक केली आहे. पर्यटक व प्लॉटधारकांच्या वाढत्या संख्येत येथे मूलभूत सुविधा अपु-या तर काही कुचकामी ठरल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बीएसएनएल सुविधेचा येथे बोजवारा उडाला आहे. वीज गेली की रेंज गायब असे चित्र असल्याने पंचक्रोशीने खासगी कंपनीचे टॉवर उभे करण्याची मागणी केली आहे. तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून वीजदाब नियमित नसल्याने वीजेची साधने जळण्याचे प्रकार घडतात. शिवाय पुरेशा विद्युत जनित्राअभावी ग्राहकांच्या मागणीनुसार वीज कनेक्शन मिळत नाही. लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या आणि गंजलेले डांब ही दुरवस्था कोण सुधारणार हा प्रश्न आहे. मानोली, आंब्यासह दहा गावांना एकच वायरमन कार्यरत आहे. सार्वजनिक सुलभ शौचालयाअभावी विशाळगड भाविकांची मोठी कुचंबणा होते. बसस्थानक, विशाळगड फाटा परिसर गलिच्छ बनला आहे. सुलभ शौचालयाची, स्वच्छता व पाणपोईची येथे गरज आहे.आंबा-विशाळगडासह डोंगरातील चाळीस गावांसाठी आरोग्य उपकेंद्राची इमारत पूर्ण आहे. मात्र, इमारत गळती दुरूस्तीसह कर्मचारी निवासव्यवस्था, शवविच्छेदनगृह व शस्त्रक्रिया थिएटरची साधनसामग्री यासाठी निधी नाही. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका व सेविका आदी पदे दीड वर्षांपासून रिक्त आहेत. वाढते अपघात पाहता येथे आरोग्य सुविधा परिपूर्ण असाव्यात, असा आग्रह आहे. येथील पाणीपुरवठा योजना मानोली गावास सलग्न आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे पाणी अपुरे पडते. चार तास वीज खंडित झाली की टाकीत पुरेसे पाणी साठवता येत नाही. पाणी गळती व वाटपातील शिस्त दूर करून मानोलीसाठीची योजना पूर्ण करण्याची गरज आहे. चाळणवाडी व धनगरवाड्याला जोडणारा रस्ता चार दशकांपासून धुळखात आहे. प्राथमिक शाळेसह अंगणवाडीची नूतन इमारत गळत आहे. येत्या पावसाळ्यात मुले शाळेत बसविणे धोक्याचे आहे. दुरूस्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. ग्रामदैवत अंबेश्वर मंदिराची गळती दुरूस्ती लांबणीवर पडली आहे. गावातील रस्त्याचे बांधकाम दर्जेदार नसल्याची तक्रार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केली.पर्यटक व भाविकांच्या सुविधांसाठी व येथील निसर्ग रक्षणासाठी प्रस्तावित पर्यटन आराखडा मंजूर झाल्यास येथील प्रेक्षणीय ठिकाणांच्या विकासाबरोबर रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, खेळ व मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता होईल. पावनखिंड, विशाळगड पाठोपाठ आंबा, मानोली, केर्ले, तळवडे या परिसरातील निसर्ग ठिकाणांच्या विकासाला निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.