शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व बरसला छप्पर फाडके!

By admin | Updated: June 6, 2016 01:10 IST

जिल्ह्याला झोडपले : अनेक ठिकाणी घरांचे छत उडाले; झाडे उन्मळून पडली; अंधाराचे साम्राज्य

कोल्हापूर : रविवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तब्बल एक तासभर झालेल्या या वादळी पावसाने उचगाव (ता. करवीर) येथे अनेक घरांचे छत उडून गेले. वाठार (ता. हातकणंगले) येथील ओढ्यावर श्रमदानातून बांधलेला बंधारा वाहून गेला, तर इचलकरंजीत गटारीचे पाणी अनेक घरांत शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. याशिवाय जिल्ह्यातील अनेक भागांत डिजिटल फलक, विद्युतवाहिन्या तुटून पडल्या; तर झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. येथे रविवारी दिवसभर ढगांचे आच्छादन राहिले. कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या वळवाची अपेक्षा होती; पण गेले आठ दिवस वरुणराजा हुलकावणी देत होता. रविवारी रात्री बारा वाजता मेघगर्जनांचा आक्रोश करीत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तासभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजेच्या आवाजाने कानठळ्या बसत होत्या. पावसाबरोबर विजेचे एवढे रौद्ररूप होते, की घराबाहेर पडण्याचे धाडस होत नव्हते. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गटारींमधून पाणी रस्त्यांवर आल्याने कोल्हापूर शहरातील रस्त्यांना अक्षरश: तळ्यांचे स्वरूप आले होते. विजेच्या तारा तुटल्याने तब्बल बारा तास ग्राहकांना अंधारात बसावे लागले. पावसाने झोपमोड केली असली तरी गेले महिनाभर पिके करपू लागल्याने झोप उडालेल्या बळिराजाला मात्र रात्री सुखाची झोप लागली. दीड-दोन महिन्यांनी शिवारात पाणी उभे राहिलेले पाहून शेतकरी आनंदित झाला. जिल्ह्यात सरासरी १४.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी सर्वाधिक ३४ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. दिवसभर आकाशात ढगांचेच आच्छादन होते. वातावरणात सुखद गारवा निर्माण झाल्याने मान्सूनची सुरुवात झाल्यासारखे वातावरण राहिले. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये करवीर- १९, कागल- १८.९४, पन्हाळा- १९.०२, शाहूवाडी- २८, हातकणंगले- ११.१२, शिरोळ- १२.८५, राधानगरी- १५.५०, गगनबावडा- ३४, भुदरगड- १५, गडहिंग्लज- ०.१४, आजरा- २, चंदगड- निरंक.