शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

घरकुलाच्या आमिषाने पैसे उकळण्याचे उद्योग

By admin | Updated: September 29, 2015 00:10 IST

कागलमधील प्रकार : नगराध्यक्षांचे सावध राहण्याचे आवाहन

कागल : नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेतील ‘सदनिका’ मिळवून देतो, असे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याचे उद्योग काहीजणांकडून सुरू असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे. सध्या या योजनेत एका टप्प्यातील सदनिकांचे वाटप पूर्ण झाले आहे, तर अंतिम बांधकाम सुरू असलेल्या दोन प्रकल्पांमध्ये लवकरच या सदनिका देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर काहीजण एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे दाखवित पाच-पन्नास हजार रुपयांचा व्यवहार करीत आहेत.एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत कागल नगरपरिषदेला ही योजना मंजूर झाली आहे. १००२ ‘सदनिका’ तयार केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात येथील शाहूनगर बेघर वसाहतीजवळ जवळपास ३५० सदनिका देण्यात आल्या आहेत. गणेशनगर आणि वड्डवाडी येथे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची घरकुले आकारास येत आहेत. अवघ्या ११ रुपयांत २७० स्क्वेअर फुटाची सदनिका मिळणार असल्याने ही योजना खूप चर्चेत आहे. मात्र, यासाठीच्या लाभार्थींची यादी यापूर्वीच मंजूर आहे तरीसुद्धा काहीजण ‘घरकुल’ मिळवून देतो असे सांगून हे व्यवहार करीत आहेत. यासाठी पाच हजारपासून पन्नास हजारापर्यंत घेतले जात आहेत. या प्रकारामुळे नगरपालिका वर्तुळातही खळबळ उडाली आहे. कागल शहरात गेली १५ वर्षे वास्तव्य असणाऱ्या आणि स्वत:चे घर नसणाऱ्या गरजूंना ही सदनिका देता येते, मात्र बोगसगिरी करणारे हे लोक परगावातील व्यक्ती, तसेच घरकुल मिळालेल्यांकडून खरेदी, असे आमिष दाखवून ‘हे व्यवहार’ करीत आहेत. (प्रतिनिधी)‘घरकुल देतो म्हणून काहीजणलोकांची फसवणूक करीत असल्याची चर्चा आमच्या कानावर आली आहे. मात्र, असे पैसे उकळणाऱ्या या बोगस टोळीच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. जर कोणी अशी रक्कम दिली असल्यास नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून द्यावे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, नागरिकांनी अशा लोकांपासून सावध रहावे.-संगीता प्रकाश गाडेकर, नगराध्यक्षा