शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

घनकचºयातून ६५० टन सेंद्रिय खताची निर्मिती- मलकापूर पालिका : कचरा डेपोचा प्रश्न निकाली, खत विक्रीतून दोन लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:26 IST

मलकापूर : मलकापूर नगरपालिकेने स्वच्छ भारत आभियानांतर्गत कचरा डेपोवर घनकचरा प्रकल्प राबवून कचºयापासून ६५० टन सेंद्रिय खत निर्मिती केली आहे.

मलकापूर : मलकापूर नगरपालिकेने स्वच्छ भारत आभियानांतर्गत कचरा डेपोवर घनकचरा प्रकल्प राबवून कचºयापासून ६५० टन सेंद्रिय खत निर्मिती केली आहे. या सेंद्रिय खत विक्रीतून पालिकेला दोन लाख रुपये मळाले आहेत. त्यामुळे साठ वर्षांचा कचरा डेपोचा प्रश्न निकाली काढला आहे. महाराष्ट्रात कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती करणाºया पुणे झोनमध्ये मलकापूर नगरपालिका पाहिली ठरली आहे .

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ, सुंदर मलकापूर शहराचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरात स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. मलकापूर शहरात रोज दीड टन कचरा जमा होतो. हा जमा झालेला कचरा उचत येथील डेपोवर टाकला जातो. गेली साठ वर्ष शहरातील कचरा येथे टाकला जात होता. मुख्याधिकारी अ‍ॅलोस पोरे, पालिकेचे उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांच्या संकल्पनेतून घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. याला सर्व नगरसेवकांनी संमती दिली. पालिका प्रशासनाने तातडीने कचरा डेपोवर मशिनरी बसवून कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती केली. शहरातील आजूबाजूच्या खेडेगावातील शेतकºयांनी सेंद्रिय खत विकत नेले. त्यामुळे पालेकेने ६५० टन खताची विक्री केले. यापासून पालिकेला दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. या सेंद्रिय खतासाठी शेतकºयांनी मागणी नोंदविली आहे.

खत निर्मितीसाठी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी दहा दिवस कचरा डेपोवर थांबून कर्मचाºयांकडून कामे करून घेतली आहेत. याच कचरा डेपोवर पालिका प्रशासनाने लोकसहभागातून सुंदर अशी बाग फुलविली आहे. या कचरा डेपोवर प्लास्टिक बॉटल क्रशिंग करण्याचे मशीन बसविले आहे.

पालिकेच्या या घनकचरा प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी फोन करून पालिकेचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरचे उपमहापौर सुनील पाटील यांनी या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आहे. पालिकेला एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. स्वच्छ सुंदर मलकापूरसाठी नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, बांधकाम सभापती राजू प्रभावळकर, मुख्याधिकारी अ‍ॅलिस पोरे, नगरसेवक, नगरसेविका, नागरिक महिला मंडळ बचत गट यांचे सहकार्य मिळत आहे.पाटील यांचे योगदानउपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्वत: घनकचरा प्रकल्पासाठी मशिनिरी उपलब्ध करून देऊन प्रकल्प चालू केला आहे. प्रकल्पावर स्वत: थांबून कर्मचाºयांकडून कामे करून घेतली. शेतकºयांशी संवाद साधून खत विक्री केली. स्वच्छ, सुंदर मलकापूरचे दिलीप पाटील आयडॉल ठरले आहेत .