शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

मोदींनी बनवले पाच वर्षांसाठी ‘एप्रिल फूल’

By admin | Updated: April 2, 2015 01:25 IST

सोशल मीडियावर मेसेजेसची धूम : कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर हास्य

कोल्हापूर : मित्रांनो, आज कुणालाही एप्रिल फूल बनवू नका; कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यातच आपल्याला पाच वर्षांसाठी ‘एप्रिल फूल’ केले आहे, आजचा हा दिवस ‘जागतिक मोदी दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी नेटिझन्सची मागणी, आता तर खरंच हद्द झाली बाबा, मला खरं सांगा की ही अफवा कोणी पसरवली की आपला अ‍ॅडमिन एप्रिलचे फूल शोधायला निघाला... अशा विविध विषयांचे विडंबन करत व्हॉट्स अ‍ॅपवर एप्रिल फूलचे संदेश पाठवत कोल्हापूरकरांनी बुधवार हास्याची लकेर कायम ठेवत घालविला.१ एप्रिल हा दिवस जवळच्या माणसांना काही ना काही कारण काढून उल्लू बनविण्याचा आणि त्यावर खळखळून हसण्याचा. आता प्रत्यक्षात समोरच्यांना किती मूर्खात काढले जाते, यापेक्षा आपण सगळे कसे मूर्ख बनलो आहोत हेच संदेश दिवसभर व्हॉट्स अ‍ॅपवर येत होते. या सगळ्यांत ‘अच्छे दिन’चे दिवा स्वप्न दाखविलेल्या पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले होते. मोदींनी आपल्याला पाच वर्षांसाठी फूल केले आहे; त्यामुळे आता कोणालाही फूल बनविण्याची गरज नाही, आजचा दिवस जागतिक मोदी दिन म्हणून साजरा केला जावा अशा आशयाचे संदेश सगळीकडे फिरत होता. आज पेपरमध्ये वाचले की, कोल्हापूर वाय-फाय सिटी होणार. नंतर कळले की आज १ एप्रिल आहे, १ एप्रिलला ‘एप्रिल फूल’ का म्हणतात, तर आपण वर्षभर गाढवासारखं राबून ३१ मार्चला कष्टाची कमाई सरकारच्या तिजोरीत टाकतो आणि १ एप्रिलपासून पुन्हा गाढवासारखं राबायला सुरुवात करतो असे संदेश येत होते. याशिवाय एकमेकांना व ग्रुपवर विनोदांची देवाणघेवाण करीत काहीजण हसत होते. याशिवाय काहीजणांकडून ‘विनाकारण पोलिसांना किंवा अग्निशमन दलाला फोन करून कुठेतरी दंगा झालाय, कुठे आग लागली आहे, असे सांगून एप्रिल फूल करू नका,’ असे चांगले संदेशही पाठविले जात होते.