शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक खेळांचे जतन करणाऱ्या आधुनिक गौराई..

By admin | Updated: September 4, 2014 00:01 IST

सादरीकरणातून खेळांचे संक्रमण : समाज प्रबोधनाचा वसा

इंदुमती गणेश - कोल्हापूर -गौरी-गणपतीच्या सणाचे औचित्य साधून स्त्रीमनाच्या भावभावनांचे कांगोरे झिम्मा-फुगडीच्या पारंपरिक खेळातून व्यक्त होतात. एकेकाळी प्रत्येक माहेरवाशिणीचे हितगूज करण्याचे हे खेळाचे माध्यम आता कालौघात लोप पावत आहे. अशा परिस्थितीत या खेळांच्या जतन आणि संवर्धनासाठी आजच्या काळातील गौराई पुढे सरसावल्या आहेत. पूर्वी श्रावण, मंगळागौर, गौरी-गणपती सण म्हणजे माहेरवाशिणींच्या आनंदाला उधाण असायचे. समाजसुधारणेचे फलित म्हणून आता तशी परिस्थिती राहिली नाही. संसार, नोकरीमुळे अनेक महिलांना मराठी संस्कृतीतील सण माहीत नसतात. खेळ खेळणे तर लांबची गोष्ट. झिम्मा-फुगडीच्या या पारंपरिक खेळांचा वारसा नव्या पिढीकडे सोपविण्यासाठी महिला पुढे आल्या व त्यांनी हे खेळ महिलांपर्यंत पोहोचविण्याचा वसा कित्येक वर्षे लीलया पेलला आहे.सुशिक्षित... नोकरदारया ग्रुपमध्ये सोळा वर्षांच्या मुलींपासून ते सत्तर वर्षांच्या आजींचा समावेश आहे. सगळ्या सुशिक्षित कुटुंबातल्या. काही गृहिणी, तर काही नोकरदार. दिवसभर आपआपले व्याप आटोपून रात्री या खेळांचा सराव केला जातो. डोहाळे.. लग्नविधीसुद्धा...झिम्मा, फुगडी, उखाणे या पारंपरिक खेळांसोबतच डोहाळे आणि लग्नविधी या दोन संस्कारांवरही मनोरंजनात्मक सादरीकरण केले जाते. लग्नविधी या सादरीकरणात लग्नात केले जाणारे सर्व विधी, त्यामागील अर्थ सांगितला जातो. वर-वधूसह कुटुंबीयांसाठी हा एकप्रकारे संसाराचा धडाच असतो. डोहाळे या सादरीकरणात गर्भसंस्काराचे महत्त्व, मातेचे आचरण, कुटुंबीयांची जबाबदारी विषद केली जाते.