कोल्हापूर : शहरात गल्लीबोळात भीक मागण्याच्या बहाण्याने चोऱ्या करणाऱ्या टोळीतील एका महिलेस लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. आरती गंगाप्पा भोसले (वय २५ रा. १०० फुटी रोड, पारधी वसाहत, मिरज, जि. सांगली) असे अटक केलल्या महिलेचे नाव आहे. तिच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचे दोेन मोबाईल संच जप्त केले. त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गल्लीबोळात भीक मागण्याच्या बहाण्याने फिरणाऱ्या दोन महिला व एका मुलाने पंधरा दिवसापूर्वी उत्तरेश्वर पेठेतील काळभैरव मंदिरामागे मोबाईल चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, माजी नगरसेवक सुरेश सुतार यांच्या घरातील तीन मोबाईल संच चोरल्याची तक्रार त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. या महिलांचा पोलीस शोध घेत असताना शुक्रवारी सायंकाळी पापाची तिकटी परिसरात आरती भोसले या महिलेस संशयावरून अटक केली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात त्यांची झडती घेतली असला चोरीचे दोन मोबाईल संच मिळाले. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
फोटो नं. ११०९२०२१-कोल-आरती भोसले (आरोपी)
110921\11kol_3_11092021_5.jpg
फोटो नं. ११०९२०२१-कोल-आरती भोसले (आरोपी)