शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मिशन आजरा-०२ : कारखाना चालवायला देण्याचा पहिला प्रयोग ‘आजरा’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:26 IST

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर खासगी कारखान्यास चालवायला देण्याचा महाराष्ट्रातील आणि किंबहुना देशातील पहिला ...

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर खासगी कारखान्यास चालवायला देण्याचा महाराष्ट्रातील आणि किंबहुना देशातील पहिला प्रयोग आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये राबविण्यात आला. कारण हे बाळ जन्मापासूनच आजारी होते. त्यावेळी सुरू झालेला अडचणींचा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे काही कठोर निर्बंध घालून घेतल्याशिवाय त्यातून कारखाना बाहेर येऊ शकत नाही.

लोकनियुक्त संचालक मंडळाने हा कारखाना १९९७-९८ ते २००३-०४ पर्यंत चालवला. त्यातही कारखान्याचे संस्थापक वसंतराव देसाई यांच्याकडे कारखान्याची सूत्रे २००१ पर्यंत राहिली. त्यानंतर जयवंतराव शिंपी यांच्याकडे नेतृत्व आले. सलग दोन वर्षे कमी झालेला पाऊस, लोकरी मा‌व्यामुळे ऊसाचे नुकसान यामुळे गाळप कमी झाले. गाळप कमी झाले तरी संचालक मंडळाचे खर्च कमी झाले नाहीत, परिणामी कारखाना आर्थिक अडचणीत सापडला म्हणून निविदा मागवून तो पहिल्यांदा २००४-०५ च्या हंगामात विद्या मुरकुंबी यांच्या मालकीच्या रेणुका शुगर्सला भाडेतत्त्वावर देण्यात आला. कारखान्याच्या स्थापनेनंतर पहिल्या गळीत हंगामानंतर पाच वर्षांतच तो भाड्याने चालवायला द्यावा लागलेला हा महाराष्ट्रातील बहुधा पहिलाच कारखाना असावा. त्याची अनेक राजकीय, व्यवस्थापकीय कारणे असली तरी पुरेसे गाळप झाले नाही हे सर्वांत महत्वाचे कारण राहिले.

पाचव्या पंचवार्षिक योजनेतंर्गत या कारखान्यास १० जुलै १९८९ ला केंद्र सरकारचे इरादा पत्र मिळाले. त्यावेळी कारखान्याचे नावही आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आंबोली, ता. सावंतवाडी असे होते. मुख्यत: आजरा, सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याची स्थापना झाली. कारखान्याच्या मंजुरीपासून सर्वासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोेठे पाठबळ लाभले. कोकणच्या सीमेवरील दोन तालुके व कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला आजरा तालुका अशी सांगड घातली गेली. या तिन्ही तालुक्यांत विकासाचा एकही प्रकल्प नव्हता. या तालुक्यातील तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची कामे करण्याशिवाय रोजगारीचे दुसरे साधन नव्हते. म्हणून त्यांच्या भविष्याचा विचार करून या कारखान्याची उभारणी झाली. एक साखर कारखाना चांगला उभा राहिला तर त्या परिसराचे नंदनवन करू शकतो, असाही अनुभव त्यामागे होता. परंतू प्रत्यक्षात घडले नाही. दिवंगत नेते वसंतराव देसाई यांच्या पुढाकाराने कारखान्याची उभारणी झाली. त्यांच्यासह त्यावेळी त्यांच्यासोबत या उभारणीत असलेले नेते ही ध्येयवेडी माणसे होती परंतु मुळातच जन्मापासूनच कारखान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सुरुवातीला कारखान्यासाठी गेळे (ता. सावंतवाडी), गवसे व देवर्डे (ता.आजरा) या जागांची पाहणी करण्यात आली. तत्कालीन साखर आयुक्त विश्वासराव धुमाळ यांच्या तज्ज्ञ समितीने गवसे येथील जागेची निवड केली. त्यामुळे कारखान्याचे नाव ७ जानेवारी १९९४ ला बदलून आजरा कारखाना गवसे (ता. आजरा) असे झाले. कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १० नोव्हेंबर १९९७ ला शरद पवार यांच्या हस्तेच सुरू झाला.

दोन प्रयोग असेही..

रेणूका शुगर्सने पाच वर्षे कारखाना चालवला तरी लोकनियुक्त संचालक मंडळ कार्यरत होते. त्यांच्यासाठी दरमहा सगळ्या गोष्टींची व्यवस्थित पूर्तता केली जात होती. रेणुकानंतर २००९-१० व २०१०-११ ही दोन ‌वर्षे हा कारखाना वारणा समूहाने चालवला. रेणुकाने कारखाना सोडला तेव्हा कारखान्यांवर फक्त ५ कोटींचे कर्ज होते.

जिल्हा बँकेने आजरा कारखान्याला पूर्वहंगामी कर्ज दोन वर्षांपूर्वीच दिले असते तर कारखान्यावर व्याजाचा भुर्दंड वाढला नसता. कारखाना बंद ठेवून जिल्हा बँकेचे कर्ज कसे फिटणार, याचा विचार झाला नाही. कारखान्याच्या अधोगतीला स्थानिक राजकारणाबरोबर जिल्हा बँकेचे आजरा कारखान्याबाबतचे धोरणही कारणीभूत आहे.

राजाराम पोतनीस

सातेवाडी, ता. आजरा व राज्य कार्यकारिणी सदस्य

सरपंच परिषद मुंबई

फोटो- २४०५२०२१-कोल-राजाराम पोतनीस-आजरा

येत्या हंगामात आजरा कारखाना सुरू झालाच पाहिजे. कारखान्याच्या नावावर गरिबांचे कैवारी, उगवते नेतृत्व उपाधी मिळवलेल्या नेत्यांनी आता भानावर यावे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगारऱ्यांचे उद्‌ध्वस्त होणारे संसार थांबवावेत आणि कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा.

अनिल देसाई

सामाजिक कार्यकर्ते

नेसरी (ता.गडहिंग्लज)

फोटो : २४०५२०२१-कोल-अनिल देसाई-आजरा

सिंगल फोटो : २४०५२०२१-कोल-वसंतराव देसाई-आजरा :

वसंतराव देसाई,

आजरा कारखान्याचे संस्थापक