शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एमआयडीसी, फळप्रक्रिया केंद्र कागदावरच

By admin | Updated: November 7, 2014 23:41 IST

बागायती जमिनींमुळे सधन : भुदरगड संपन्न, पण समस्या पाठ सोडेनात--भुदरगड तालुका

शिवाजी सावंत - गारगोटी -पाटगाव मध्यम प्रकल्पासह अनेक छोट्या धरणांनी युक्त असणारा भुदरगड तालुका हा हजारो हेक्टर जमिनी सिंचनाखाली असणारा तालुका आहे. सूतगिरणी, साखर कारखाना, दळण-वळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असून, शिक्षणक्षेत्रातील पंढरी असल्याने सुशिक्षितांची मांदियाळी असणारा प्रगतशील सुजाण तालुका आहे. मात्र, गेली अनेक दशके अनेक समस्या अश्वधामासारख्या सोबत घेऊन वावरत आहे. या तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली. पुढे मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक इंजिनिअर, ग्रामसेवक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक इंजिनिअर असणाऱ्या या तालुक्याला उगमापासून उत्तर-पूर्व ५७ कि.मी. वाहणाऱ्या वेदगंगा नदीने काठालगत असणाऱ्या गावांचे जीवन फुलविले आहे. या नदीवरील मौनीसागर जलाशय हा मध्यम प्रकल्प, तर फये, चिकोत्रा, कोंडोशी, मेघोली, नागणवाडी या छोट्या प्रकल्पांमुळे ७ हजार ६५७ हेक्टर जमिनी पाण्याखाली आल्या. त्यामुळे शेतकरी सुखावला. शिवाय उत्पादित होणारा ऊस तालुक्यालगतचे साखर कारखाने नेऊ लागले. भाजीपाल्यासाठीे मार्केट आहे. नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शैक्षणिक आणि बागायती जमिनीमुळे सधन असलेल्या या तालुक्यात दुर्गम, डोंगराळ भाग मागास राहिलेला आहे. वीस वर्षांपूर्वी आकुर्डे गावाच्या पठारावर मंजूर झालेली एम.आय.डी.सी. आजही कागदावरच आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना रोजगारासाठी गाव, घर सोडण्याशिवाय गत्यंतर नाही. जगातील पहिला महिला साखर कारखाना सुरुवातीपासूनच आर्थिक अरिष्टात सापडल्यामुळे ४०० कामगारांसह हजारो लोकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक वाहतूकदार, तोडणी कामगार, शेतकरी, छोटे-मोठे व्यावसाइक यांना हा कारखाना सुरूहोणे नितांत गरजेचे आहे.गोव्याला जोडणारा सोनवडे-घाटगे घाट हा केवळ वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे केवळ सात कि.मी. अंतरासाठी ठप्प झाला आहे. एकीकडे पवनचक्क्यांसाठी हजारो एकर जमिनी दिल्या जात असताना लोकांच्या सोईकरिता केवळ सात कि.मी. अंतरासाठी रस्ता दिला जात नाही. हा घाट झाल्यास कोकणात जाणे सुलभ होईल. ऐंशी कि.मी.ने गोव्याचे अंतर कमी होईल. तालुक्यातील ७० हजारांपेक्षा जास्त संख्या असणाऱ्या पाळीव जनावरांकरिता दहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, २००६ पासून आजअखेर सहा पदे रिक्त आहेत. शासनाच्या नाकर्तेपणामुळेही करोडो रुपयांची पशुसंपदा रामभरोसे आहे. हेच चित्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात आहे. गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालय वगळता कोठेही सुसज्ज रुग्णालये नाहीत. तालुक्यात २३ हजार ७५६ हेक्टर वनक्षेत्र आहे. या जंगलात अनेक वनौषधी आहेत. त्यांच्यावर कोणतेही संशोधन अथवा औषधनिर्माण केंद्र नाही. त्यामुळे लाखमोलाची वनौषधी विनावापर नष्ट होत आहे. आंबा, काजू, जांभूळ, करवंदे यासारख्या फळांची अनेक जाती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत; पण एखादाही फळप्रक्रिया उद्योग नसल्याने ही फळे कुजून जात आहेत. या तालुक्यात १६०० ते २००० मिलिमीटर पाऊस पडतो. धरणे भरल्यानंतर १० ते १५ टी.एम.सी. पाणी वाहून जाते. चिकोत्रा धरण बांधल्यापासून केवळ एकवेळाच भरले, अन्यथा निम्मे धरणसुद्धा भरत नाही; पण शेळोली येथे वेदगंगा नदीवर जर जल उपसा केंद्र उभारून पाणी चिकोत्रा धरणात टाकले, तर धरण पूर्ण क्षमतेने भरेल. शिवाय आणखी ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणता येईल. प्रलंबित असणारे डेळे, चिवाळे, निष्णप आणि अर्धवट स्थितीत असणारा नागनवाडी हे प्रकल्प पूर्ण झाल्यास आणखीन क्षेत्र ओलिताखाली येईल. मिणचे खोऱ्यात जाणारा कालवा अस्तरीकर न झाल्याने वेळोवेळी फुटतो. त्याचे अस्तरीकरण झाल्यास मातीचे व शेतीचे नुकसान होणार नाही.सुजलाम्-सुफलाम् आणि अतिप्रगत दिसणारा हा तालुका आजही गंभीर समस्यांच्या गर्तेत आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी काम करणाऱ्या पोलिसांना राहण्यासाठी क्वार्टर नाहीत. त्यामुळे त्यांना भाडोत्री जागेत रहावे लागत आहे. महत्त्वाच्या समस्यागेली १५ वर्षे प्रलंबित असणारी एम.आय.डी.सी. होणे नितांत गरजेचे आहे. २००६ पासून १० पैकी ६ डॉक्टर्स रिक्त पशुसंपदेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर.पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवास होणे गरजेचे.सोनवडे-घाटगे, पाणंद रस्ते यामध्ये अतिक्रमणात दिवसागणिक वाढ.ऐतिहासिक गडकोटांचे संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी समाधी व पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे.जिल्हा परिषदेच्या तालुका कृषी विभागाला स्वत:ची जागा नसल्याने कार्यालय भाडोत्री जागेत.मुदाळतिट्टा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक.१०१ गावे आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या १४ वाड्यांपैकी केवळ १३ गावांचा सिटी सर्व्हे झाला आहे. उर्वरित गावांचा, वाड्यांचा अद्ययावत सर्व्हे होणे आवश्यक.शेतीसाठी पाण्याची समस्या.प्रलंबित असणारे डेळे-चिवाळे, निष्णप, नागणवाडी हे लघु प्रकल्प.बेगवडे, बेडीव, सावतवाडी या गावालगत असणाऱ्या विस्तीर्ण पठारावर छोटे-छोटे वनबंधारे आवश्यक .शेळोली येथून पावसाळ्यात जलउपसा केल्यास चिकोत्रा धरण भरू शकते.गारगोटी शहराच्या समस्याशहराच्या विकासासाठी सुधारित आराखडा हवाघनकचरा आणि नाल्यातील दूषित पाणी यांच्या निस्सारणासाठी उपाययोजना आवश्यक.एकमेव अशा ग्रामीण रुग्णालयात अपघात विभाग आणि इतर संलग्न विभाग अद्ययावत होणे गरजेचेहद्दवाढ होणे आवश्यकशहरात एकही बगीचा नाही