शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

‘मायक्रो फायनान्स’चा विळखा

By admin | Updated: December 26, 2016 21:50 IST

शाहूवाडी तालुका : कर्ज वसुलीसाठी बचतगटांच्या महिलांकडे तगादा

शित्तूर-वारुण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिला बचत गटांना घरगुती व छोट्या व्यवसायांसाठी कर्जपुरवठा केलेला असून, कर्ज वसुलीसाठी बचतगटांच्या महिलांना जेरीस आणले जात आहे.शित्तूर-वारुण, खेडे परिसरातील गावांसह वाड्या-वस्त्यांवरील अनेक महिला बचतगटांनी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची वसुली पंधरवड्यातून एकदा ठरलेल्या दिवशी केली जाते. कर्ज वसुलीच्या दिवशी एखाद्या महिलेकडे पैसे नसतील तर बाकीच्या सर्व महिलांना पैसे मिळेपर्यंत त्याच ठिकाणी बसवून वेठीस धरले जाते. जमत नसेल तर उरलेली सर्व रक्कम एक साथ भरा आणि मोकळे व्हा, अशा प्रकारे वसुली अधिकाऱ्यांकडून बोलले जाते. पैशाऐवजी चेकचा स्वीकार केला जात नाही, अशा विविध कारणांमुळे महिला बचतगटांतील महिलांचे आर्थिक शोषण होत असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नोटाबंदीमुळे अडचणीत आलेल्या सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. नोटाबंदीपूर्वी दूध उत्पादकांना दहा दिवसांनी बिल मिळायचे. शेतकरी, शेतमजुरांच्या हातात दैनंदिन व्यवहाराइतका खेळता पैसा असायचा; परंतु नोटाबंदी आणि सध्याच्या चलन तुटवड्यामुळे सामान्य माणसांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याने बचतगट मेटाकुटीस आलेले आहेत.महिला बचतगटाच्या सदस्य मनीषा नांगरे म्हणाल्या, सध्या वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा हप्ता मासिक करण्यात यावा. नोटाबंदी आणि चलन तुटवड्यामुळे सध्याची वसुली स्थगित करून चलन व्यवहार सुरळीत झाल्यानंतरच कर्ज वसुलीस सुरुवात करावी. रोख रक्कम नसेल अशावेळी फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांनी चेक स्वीकारून बचतगटांना सहकार्य करावे. यावेळी बोलताना महिला बचत गटाच्या सदस्य नंदाताई कांबळे म्हणाल्या, फायनान्स कंपनीकडून महिला बचतगटातील महिलांचे होत असलेले आर्थिक शोषण व पिळवणूक थांबवावी. फायनान्स कंपनीच्या जाचक अटी शिथील करण्यात याव्यात.