शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक देखाव्यातून स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: September 19, 2015 00:03 IST

गणेशोत्सव : सांगरूळच्या चंद्रकांत जंगम यांची २५ वर्षांची परंपरा

कोल्हापूर : ‘फेटेवाला पैलवान’ असो अथवा ‘गोरिला माकड’, या प्रतिकृतींच्या माध्यमातून करमणूक करण्याबरोबरच समाजप्रबोधनाची २५ वर्षांची परंपरा सांगरूळच्या चंद्रकांत जंगम यांनी कायम राखली आहे. यावर्षी त्यांनी उंदराच्या पाच फूट उंचीच्या तांत्रिक देखाव्यातून स्वच्छतेचे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य कुटुंबात जन्माला आलेले चंद्रकांत जंगम यांना लहानपणापासूनच पेंटिंगची हौस होती. दहावी पूर्ण होताच त्यांनी हातात ब्रश धरला. पेंटिंग व्यवसायातून त्यांचा उदारनिर्वाह सुरू राहिला; पण समाजातील विविध प्रथा, त्यातून निसर्गाचा ढासळणारा समतोल याबद्दलची तळमळ त्यांच्या मनातून जात नव्हती. यासाठी त्यांनी विविध पक्षी, जनावरे यांच्या प्रतिकृती करून त्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यास सुरुवात केली. गेली पंचवीस वर्षे ते झपाटल्यासारखे काम करीत आहेत. प्रत्येक गणेशोत्सवात वेगवेगळ्या प्रतिकृती करायच्या आणि तरुण मंडळांच्या माध्यमातून त्या समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. आतापर्यंत त्यांनी ‘गॉडझिला’, ‘ विश्वविनायक’, ‘अ‍ॅनाकोंडा’, ‘गोरिला माकड’, ‘फेटेवाला पैलवान’, ‘कोंबडा’, ‘चिनी राक्षस,’ आदी एकापेक्षा एक अशा भन्नाट प्रतिकृती तयार केल्या आहेत. या प्रत्येक प्रतिकृतीचा त्यांनी समाजप्रबोधनासाठीच वापर केला. गणेशोत्सवात या प्रतिकृती करमणुकीचे माध्यम म्हणून जरी दिसत असल्या तरी त्यांतून चंद्रकांत जंगम यांचे समाजातील अनिष्ट प्रथा व सवयींवर प्रकाश टाकण्याचे काम सुरू आहे. यावर्षी त्यांनी पाच फूट उंचीचे सोळा उंदीर तयार केले आहेत. एकाच वेळी चार उंदीर विविध प्रकारचे संदेश देणार आहेत. यामध्ये कचरा, पाणी, प्लास्टिक, व्यसनांतून होणारी अस्वच्छता, आदी विषयांवर ते प्रबोधन करणार आहेत. या तांत्रिक देखाव्यांचे चंदगड, बेळगाव, संकेश्वर, रत्नागिरी, सातारा येथील मंडळांनी बुकिंग केले आहे. जंगम यांना देखावे तयार करण्यासाठी मुलगा विनय व मित्र आनंदा खाडे यांचे सहकार्य लाभते. या देखाव्यातून पैसे किती मिळतात यापेक्षा सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून २५ वर्षे अविरतपणे काम करीत आहे. माझ्या प्रबोधनाला कदाचित मर्यादाही असतील; पण येथून पुढेही मी हे काम करीत राहणार आहे. - चंद्रकांत जंगम