शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी दराबाबत बुधवारी होणार बैठक

By admin | Updated: November 17, 2014 00:36 IST

सकारात्मक चर्चा झाली तर ठीक, अन्यथा कोयता बंद

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक दराबाबत राज्य शासन व ऊस तोडणी-वाहतूक संघटना यांच्यात बुधवारी (दि. १९) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत तोडणी व वाहतूक दरासह इतर मागण्यांबाबत चर्चा होणार असून, सकारात्मक चर्चा झाली, तर ठीक अन्यथा २५ नोव्हेंबरपासून ‘कोयता बंद’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक दराबाबत तीन वर्षांपूर्वी करार झालेला आहे. त्याची मुदत संपल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ऊसतोडणी व वाहतूक संघटनेच्यावतीने शासन दरबारी प्रयत्न सुरू केले होते. आघाडी सरकारने यासंबंधी दोन बैठका घेऊन चर्चा सुरू केली होती; पण तोपर्यंत राज्यात सरकार बदलल्याने पुन्हा हा प्रश्न भिजत राहिला आहे. नवीन सरकार आल्यानंतर ऊसतोडणी व वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. सरकारवरील अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारच्यावतीने देण्यात आले. २४ नोव्हेंबरपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही, तर २५ नोव्हेंबरपासून कोेयता बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. बुधवारी बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये ऊसतोडणी व वाहतूक दर, ऊसतोडणी मजुरांचे कल्याणकारी मंडळ, अपघात विमा, आदी प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. सरकारने बुधवारी यासंबंधी बैठक बोलविल्याचे समजते. यामध्ये सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा आहे. मागण्या मान्य नाही झाल्या, तर नाईलास्तव पुन्हा आंदोलन करावे लागेल. - डॉ. सुभाष जाधव (सरचिटणीस, राज्य ऊसतोडणी व वाहतूक संघटना)