शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत आज, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा ...

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत आज, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे खासदार संभाजीराजे, मराठा समाजातील सात समन्वयकांसमवेत चर्चा करणार आहेत.

कोल्हापुरात बुधवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या मूक आंदोलनामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा समाजाचे आरक्षण आणि अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी मुंबईला यावे, असे राज्य सरकारच्यावतीने निमंत्रण दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईत बैठक आयोजित केली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि मागण्यांशी संबंधित असलेल्या खात्यांचे मंत्री उपस्थित असणार आहेत.

प्रतिक्रिया

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी गुरुवारी येण्याचा आग्रह केला. त्यानुसार सकल मराठा समाजातील समन्वयकांशी चर्चा केली. त्यातील निर्णयानुसार या बैठकीसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासमवेत सात समन्वयक असणार आहेत. मागण्यांबाबत सरकारने एक पाऊल टाकले असल्याने आम्ही चर्चेसाठी पाऊल पुढे टाकले आहे.

-खासदार संभाजीराजे