शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत आज कोल्हापुरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने समाजामध्ये असंतोष आहे. याबाबत खासदार संभाजीराजे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने समाजामध्ये असंतोष आहे. याबाबत खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तत्पूर्वी कोल्हापुरातील कायदेतज्ज्ञ, तालीम संस्थांच्या प्रतिनिधींशी आज, सोमवारी चर्चा करणार आहेत.

राज्यातील मागील व सध्याच्या सरकारने मराठा समाजाचा खेळ केला असून मराठा आरक्षणाचा कायदा योग्य पद्धतीने केला नसल्याने समाजावर ही वेळ आल्याचे खासदार संभाजीराजे यांचे म्हणणे आहे. आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला २७ मेचा अल्टीमेटम दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील समाजाशी संवाद साधून पुढील रणनीती काय ठरवावी, याची चाचपणी करणार आहेत.

कोल्हापुरात आज सकाळी ११ वाजता शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे शहरातील कायदेज्ज्ञ, तालीम संस्थांचे प्रतिनिधींसोबत संभाजीराजे चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते राज्यभर दौरा करून समाजाची चर्चा करणार आहेत. २७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून संभाजीराजे पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत.

संभाजीराजे आज शाहू महाराजांना अभिवादन करणार

कोल्हापुरातील बैठकीला जाण्यापूर्वी खासदार संभाजीराजे हे नर्सरी गार्डन, टाऊन हॉल येथे जाऊन रजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन करणार आहेत.

संघर्ष समितीची ३ जूनला दिशा ठरविणार

मराठा आरक्षणामध्ये राज्य सरकारने योग्य मांडणी न केल्याने समाज अडचणीत आला. आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई कशी लढायची यासह एकूणच दिशा ठरविण्यासाठी ३ जून रोजी कोल्हापुरात मराठा आरक्षण संघर्ष समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.