शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टोलबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक

By admin | Updated: December 11, 2014 00:33 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : कोल्हापूरच्या आमदारांनी घेतली भेट

कोल्हापूर : कोल्हापूर शहरांतर्गत टोलबाबत हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात आमदार सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, अमल महाडिक यांचा समावेश होता. ‘आयआरबी’ने कोल्हापूर शहरातील ४९.४९ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करणे आवश्यक होते; पण या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. युटीलिटी शिफ्टिंगची कामे अद्यापही अपूर्ण असताना कंपनी अन्यायकारक टोलवसुली करत आहे. शासकीय कार्यालय व करवीर तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये शहरात असल्याने ग्रामीण भागातील जनता दररोज खासगी वाहनातून येत असते. त्याचबरोबर गूळ व भाजीपाल्याच्या विक्रीसाठी हजारो शेतकरी कोल्हापूर शहरात येतात. या टोलचा भुर्दंड जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला बसत आहे. गेली चार वर्षे कोल्हापूरची जनता सनदशीर मार्गाने न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करीत आहे. ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांकडून टोलवसुलीसाठी नेहमीच वाहनधारकांना अरेरावी, शिवीगाळ व मारहाण केली जाते. महिलांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की झाली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यांचे फेरमूल्यांकन करून युती सरकारच्या माध्यमातून टोलवसुली बंद करण्यासाठी शासनाकडून अनुदान मंजूर करावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. यावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व जिल्ह्यातील सर्व आमदारांसोबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (प्रतिनिधी)