शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टोलबाबत आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

By admin | Updated: December 24, 2014 00:17 IST

चंद्रदीप नरकेंचा पुढाकार : जिल्ह्याचे लागून राहिले लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील टोलबाबत उद्या, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुख्यमंत्री दालनात बैठक आयोजित केली आहे. गेले दोन दिवस आमदार चंद्रदीप नरके यांनी बैठकीसाठी प्रयत्न सुरू केले होते. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर टोल हद्दपार करण्याची गर्जना सर्वच भाजप नेत्यांनी केली होती. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात येऊन शहरातील टोल रद्द करण्याचे अभिवचन कोल्हापूरकरांना दिले होते; पण सरकार सत्तेवर येऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी कोल्हापूरच्या टोलबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. ‘आयआरबी’ने केलेली टोलवसुली रद्द करावी, यासाठी १० डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. टोलबाबत कोल्हापूरच्या जनतेत कमालीचा संताप असून, टोलवसुली कर्मचाऱ्यांच्या दमदाटीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूरची टोलवसुली रद्द करून शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार नरके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. अखेर आज, मंगळवारी बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असून, उद्या दुपारी साडेतीन वाजता नागपूर येथे ही बैठक होत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापुरातील आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबीटकर, सत्यजित पाटील, सुरेश हाळवणकर, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थित बैठक आयोजित केल्याची माहिती आमदार नरके यांनी दिली. (प्रतिनिधी)